Maitri Kavita Marathi

शाळेतील मित्र By श्री.राजेश साबळे ओतूरकर | Best Maitri Kavita Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.राजेश साबळे ओतूरकर यांची -शाळेतील मित्र- हि कविता -Maitri Kavita Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

शाळेतील मित्र | Maitri Kavita Marathi

शाळेतील मित्र By श्री.राजेश साबळे ओतूरकर | Best Maitri Kavita Marathi 2023

लहान होतो म्हणून, कळत नव्हते काही!
मित्र ही नव्हते पण, गोठ्यात होत्या गाई!!

बापा सोबत रानात, गायी नेई चारायला!
बरेच गुराखी तेंव्हा ,जमायचे खेळायला!!

खो खो लंगडी हुतूतू, खेळ इथं खेळायचो!
पाऊस येताच मात्र, घोंगता शिरी घ्यायचो!!

सात वर्षाचा होताच, हाती खापरची पाटी!
घरा जवळच शाळा, दप्तर नव्हते पाठी!!

वही पुस्तक नाही हो, हाती पाटी पुसायची
पुसलेल्या पाटीवर, बाराखडी लिहायची!!

आठवड्यात एकदा, सुट्टी असे रविवारी!
गुराखी पोरांसोबत, करीत असे मस्करी!!

आई बापाला नव्हत, शाळेचं काही कळत!
पाटी फुटली तर तू, नको जावू साळत!!

माझ्या वर्गात एकदा, मुलांचा झाला झगडा!
वर्गामंत्री कसा झाला, म्हणून झाला रहाडा!!

गाव आणि शिवाराचे, दोन झाले होते तट!
वर्गमंत्री होताच मी, शाळेत वाढली वट!!

याच भांडणाचा मला, झाला मोठा फायदा!
शाळेच्या निवडणुकीत, भेटला एक दादा!!

तो ही विद्यार्थीच होता, पण सर्व त्याला भीत!
भानगडी करणारी, त्यालाच पुढे करीत!!

रागातच आला तो, तेंव्हा माझ्या अंगावर!
पकडली मानगुटी, घट्ट धरली कॉलर!!

माज आला काय म्हणे, निवडणुका लढवतो!
मी कोण आहे ते आता, मीच तुला दाखवतो!!

अवतार पाहताच, गेलो होतो घाबरून!
कुठे राहतो म्हणाला, तरच तुला सोडीन!!

ठिकाण सांगताच मी, त्यानं हात घेतला मग!
अचानक म्हणाला तो, बोलायचं तुझ्या संगl!

काहीच कळल नाही, एकदम काय झालं!
संध्याकाळी घरी माझ्या, ते बहीण भाऊ आलं!!

अंगणातच भेटली, आमची वहिनी बाय!
निवडून आला दीर, आनंद दुसर काय!!

कसली निवडणूक, आणि कसल काय!
वहिनीला यातल, काहीच कळलं नाय!!

सुरू झाली चर्चा मोठी, भांडण राहिल दूर!
गरिबाच्या झोपडीचा, बदलून गेला नुर!!

मैत्र झालो दोघं आता, सापडला एक सुर!
घरातल्या मंडळींची, काळजीच झाली दूर!!

अडीच तीन मैलांची, पायपीट माझी थांबली!
मित्राकडे माझ्या आता, राहण्याची सोय झाली!!

वयाने मोठा होता तो, पण सखा भाऊ वाटायचा!
अडथळे माझे सारे, स्वतः दूर टाकायचा!!

जुनी अकरावी झाली, शिक्षण माझं थांबलं!
गरिबीच्या झोपडीला, पुन्हा दीनपण आलं!!

मी रस्ता धरला होता, रोजगार हमी कामाचा!
मित्राने भरला तेंव्हा, फॉर्म माझा कॉलेजचा!!

बहात्तरचा दुष्काळ, आता घरातही आला!
कॉलेजात नेण्यासाठी, मित्रच घरात आला!!

मी म्हटलं येवू कसा, इथ आभाळ फाटलं!
मॅट्रिक पर्यंत मित्रा, नव्हत काही वाटलं!!

मोठ्या मनाने माझा तू, प्रवेश फॉर्म भरला!
प्रवेश तुझा न होता, माझा नंबर लागला!!

तू घरी मी कॉलेजात, मित्रा हे पटत नाही!
तुझ्या प्रवेशाशिवाय, हा प्रश्न सुटत नाही!!

नातेवाईक मित्राने, प्रश्न माझा सोडवला!
एका वर्षात मित्राचा, कॉलेज प्रश्न सुटला!!

आम्ही दोघंही पुण्यात, रोजच भेटू लागलो!
शिक्षणपूर्ण करून, नोकरीला ही लागलो!!

नोकरीत असताना, तो गावी मी शहरात!
लग्नात समारंभात,भेटत होतो सुट्टीत!!

सेवानिवृत्ती दोघांची, रमलोय संसारात!
खुप छान चाललाय, मुलाबाळांच्या घरात!!

लिहीतो कथा-कविता, शब्दात मांडतो व्यथा!
माझा पुस्तकांचा देतो, त्याच्या हाती मोठा गठ्ठा!!

जपली मैत्री प्रेमाने, म्हणून सांगतो खरं!
विचार एक असेल, मनाला वाटते बरं!!

ओळख संकटातच, मित्राच्या नात्याची खरी!
ऋण मुक्त होण्याची रे, आता कोण देतो खात्री!!

असा दिलदार मित्र, जगी सर्वांना मिळवा!
अडीनडीला आपण, हातभार ही लावावा!!
…………………………..
राजेश साबळे,ओतूरकर

शाळेतील मित्र | Maitri Kavita Marathi

Best Maitri Kavita Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

शाळेतील मित्र | Maitri Kavita Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
17 + 24 =