काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.Anita barge bhosale यांची -एक जिवलग मित्र – हि कविता -Maitri Kavita Marathi Madhe- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
एक जिवलग मित्र By सौ. Anita barge bhosale| Best Maitri Kavita Marathi Madhe 2023
एक जिवलग मित्र | Maitri Kavita Marathi Madhe

भेट तुझी माझी अशी
अवचित झाली,
आणि नजरेचा तिरका
कटाक्ष टाकून गेली.
तुझ्या माझ्या मैत्री चिही
आठवण तुझ्या माझ्या
मैत्रीतिल हा स्पर्श
आणि मैत्रीचा ओलावा
कायम असाच राहील.
आजही त्याच जागेवर
वाट पाहत बसते,
आणि अवचित भेटेची
स्वप्ने पाहत असते.
म्हणून एक जिवलग मित्र
नक्कीच असावा.
एकाने चार दिवस फोन नाही केला
की लगेच दुसऱ्याने खबर घ्यावी
जिवंत आहेस का खपला
बिनधास्त असा प्रश्न केला तरी चालेल
पण खुशाली विचारून घेणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा….
अधून मधून तुम्ही ज्या मित्राकडे
नित्य फेरी मारत असता
चार दिवस तुम्ही त्याला दिसले नाही
तेव्हा बेचैन होऊन कळवळीने
तुमच्या घराकडे धाव घेणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा…..
चूक झाली असेल तर हक्काने
चुकलो यार माफ कर
असे म्हणणारे कोवळे हृदय असावे
काही अनधिकृत गोष्टी घडल्या
तर काळजातून विसरून जाऊन
उत्स्फूर्तपणे घट्ट अशी मिठी मारणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा….
कधी-कधी समोरून माफ करणारे
देखील एक विशाल हृदय असावे
मैत्रीत हक्काने नक्कीच रुसावे
पण अबोला मात्र कायमचा नसावा
हळूच हसून चल यार chill कर
मैत्रीत हे असं चालतंच असते म्हणणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा….
एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात
कधी चित तर कधी पट
चुका दोन्ही बाजूंनी होऊ शकतात
मग एकच बाजू सही अशी कुवत नसावी
दोन्ही बाजू पडताळून बघणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा…….
गोष्ट कुठली ही असो अडून बसू नये
छोट्या मोठ्या कारणास्तव मैत्री तोडू नये
अजिबात जिवाला जीव देऊ नये
पण आपल्याला जीव लावणाऱ्या मित्राला
आयुष्यात कधीच न विसरणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा…….
वेळात वेळ काढून कधीतरी मनसोक्त
मित्रा बरोबर सैर सपाटा करणारा
घडलेल्या गमती जमती आठवून
आनंदाने डोळे भरून येईपर्यंत हसणारा
मान सन्मान देणारा नसेल तरी चालेल
पण भावनांचा कदर करणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा…….
कुणासाठी काहीतरी स्पेशल करतो
तेव्हा ती गोष्ट म्हणजे उपकार नसते
तर त्या व्यक्तीच्या हृदयात तुमच्या प्रति
सर्वात जास्त प्रेम व जिव्हाळा असतो
पण अशा निस्वार्थ प्रेमाला ओळखणारा
एक जिवलग मित्र नक्कीच असावा…….
एक जिवलग मित्र By सौ. Anita barge bhosale| Best Maitri Kavita Marathi Madhe 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
एक जिवलग मित्र By सौ. Anita barge bhosale| Best Maitri Kavita Marathi Madhe 2023
Nice
Thanks All
खूप छान 👌🏻👌🏻👏🏻👏🏻😊😊👍🏻👍🏻
Thanks❣
💖😇💖😇💖😇💖😇💖😇💖
💫💯🤭✨️अनिता पण लय भारी देवा 🤭👀💯🙈💫
Khup chan 👌👌👌