Maitri Kavita Marathi Text

मैत्रीचं नातं By कुमारी. Pooja Maruti Patil | Best Maitri Kavita Marathi Text 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.Pooja Maruti Patil यांची -मैत्रीचं नातं – हि कविता -Maitri Kavita Marathi Text- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्रीचं नातं By कुमारी.Pooja Maruti Patil | Best Maitri Kavita Marathi Text 2023

तुझी आणि माझी मैत्री | Maitri Kavita Marathi Text

मैत्रीचं नातं By कुमारी. Pooja Maruti Patil | Best Maitri Kavita Marathi Text 2023

मैत्रीचं नातं तू
त्यां नात्यातलं जन्म तू
जन्मोजन्मीचं नातं तू
त्यां नात्यातलं प्रेम तू
आणि प्रेमाचं नातं तू

दूर गेलीस कितीही तू तरीही
आठवण तुझी काढत राहील
तुझ्या त्या आठवणीचा सागरामध्ये माझी
छोटीशी नाव चालवत राहील

तुझी आणि माझी
मैत्री अशी असावी
मनसोक्त हसवणारी ,क्षणा- क्षणाला आठवणारी
नेहमी आनंदी ठेवणारी
सुख : दुःखात सामील होणारी
कधीही न बदलणारी

‌ भावना आहेत खूप साऱ्या
सांगण्यासारख्या पण सांगू वाटत नाही
माझ्या भावना सांगून माझ्या सखीला मी कधी
नाराज करत नाही

येत आहेत जात आहेत
बरेच वादळ माझ्या आयुष्यात
तरीही तुझी आठवण काढत राहील
तेथेच थांबून न डगमगता आपण कसं दोघी
चमकत राहील

भावना व्यक्त करायला भावना असतील
तर भावना व्यक्त करत जा
आयुष्य आपल्या सर्वांचं छोटं आहे
थोडं तरी बोलत जा

तू आज आहे तशी उद्याही
राहशील का
कोणी कितीही आले तुझ्या आयुष्यामध्ये
पण तू माझी जागा
दुसऱ्या कोणाला देशील का
आपल्या मैत्रीचं नातं
शेवटपर्यंत टिकवशील का

आपल्या मैत्रीत
शब्द कमी आणि भावना जास्त असतात
भांडणं कमी आणि प्रेम जास्त असते
अपेक्षा कमी ,काळजी जास्त असते
कितीही दूर असलो तरीही ऐकमेकांना
भेटण्याची ओढ मनात कायम असते

कधी तुझ्याशी भांडले रागवले तर
माझ्याशी कधी अबोला धरू नकोस
छोट्या छोट्या कारणांवरून मला
ऐकटीला सोडून जाऊ नकोस

तू दूर असून पण माझ्या
सोबत आहेस
तुझ्या मनातील माझी जागा फक्त
दुसऱ्या कोणाला देऊ नकोस

कितीही संकटे आली तरीही
तुझी कधी साथ सोडणार नाही
मनापासून मैत्री केली आहे तुझ्याशी
तुला कधी विसरणार नाही

मिळेल वेळ तुला तेव्हा
वेळ नसेल मला
जेव्हा मी तुझ्या जगात नसेल सखी
तेव्हा वेळ असेल खूप तुला

पूजा पाटील

मैत्रीचं नातं By कुमारी.Pooja Maruti Patil | Best Maitri Kavita Marathi Text 2023

Best Maitri Kavita Marathi Text 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मैत्रीचं नातं By कुमारी.Pooja Maruti Patil | Best Maitri Kavita Marathi Text 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
13 + 14 =