काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.रेखा सुर्यकांत कांबळे यांची -तुझी माझी मैत्री- हि कविता -Maitri Poem In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तुझी माझी मैत्री By सौ.रेखा सुर्यकांत कांबळे | Best Maitri Poem In Marathi 2023
तुझी माझी मैत्री | Maitri Poem In Marathi

मैत्रीला वयाच बंधन नसतं
हे नात कुठही, कधीही, कसही
फुलन बहरत
हातात-हात घेता, घट्ट होते जे नाते
जी जपते ,सांभाळते, विश्वासाने दृढ होते
तुला भेटल्यावर झाली खात्री
‘ लय-भारी ‘आहे तुझी – माझी मैत्री
सुख- दुखात एकत्र यावे
मिळुन हसावे, मिळुन रडावे
अडी-अडचणीत एकमेकींना
सोबत व्हावे
तुझी साथ अशी क्षणोक्षणी लाभावी
तुझा आधार, ही करेल हलका भार
मनावरचं ओझ ही खाली व्हाव
इतक्या विश्वासानं
मी मनमोकळ कराव .
आलाच कधी दुरावा
झालोच कधी अबोल
तरीही कळतील एकमेकींना
आपल्या मनातील सल
रागवावे, चुकासाठी ओरडावे
दयावे-घ्यावे तरी ‘मैत्री ‘अन ‘व्यवहार ‘
बाजुला ठेवावे
दोघींचे सारे सेम असावे
बघण्यानाही लांबून कळावे
जळण्यानी खुशाल जळावे
आपली मैत्री मात्र रोज नव्याने बहरावे
चुकांना क्षमा असावी
रोख- ठोक तोंडगळ व्हावी
किंतु नसावा मनात
शंका न यावी नात्यात
आपलेपणा असावा गुंतवयात
वाढावा गोडवा या दुनियेत
समजं- गैरसमज वेळीच
सावरून-मिटवुन घ्यावेत
तुझी माझी मैत्री
पहात नाहीत, दिवस- रात्री
साऱ्या गोड आठवणींची
जगलेल्या- जिंकलेल्या क्षणांची
उणीव असावी दोघानाही
इतक्या जिव्हाळ्याची
रक्तातेसाठी श्रेष्ठ अशा ‘मैत्रीण ‘ या नात्याची
गंमत आहे न्यारी
सगळ्या घोळक्यात ,
चारचौघीत
ओळखून यावी, आपली यारी
अशी तुझी-माझी मैत्री
लक्षात ठेवेल दुनिया सारी….
मैत्रीत कोणतेही नियम नसावे, ती खुली, स्वतंत्र असावी. लांब जरी राहिलो तरी वेळेस धावून येणारी रहावी.ओठातले गुपीत पोटात रहावे अन डोळयातले पाणी हसत-हसत बाहेर पडावे.
न सांगताही सारे कळावे, इतके बोलके भाव तिने वाचावे.
तुझ-माझ करता, करता “आपल “होऊन जाव.
आजारी आहे समजल की तु कासावीस व्हाव, तुला पाहताच मी उठून बसाव.
नव चैतन्य मला स्फुराव. दुखण माझ पळून जाव. मैत्रिणीच असतात जीवाला जीव देणाऱ्या, अन साभांळून घेणाऱ्या.
या मैत्रिणीच संजीवनी बनून आपल्यात लढण्याच, जगण्याच बळ आणून आत्मविश्वास आणतात.
न हारता, न खचता उभे राहण्यास आधार देतात .
अशा मैत्रीला,अशा मैत्रिणींना दिलसे लव यू..
शेवटी श्वास असेपर्यंत निभावणार ही दोस्ती प्यारी….❤️❤️❤️❤️❤️❤️.
सौ.रेखा सुर्यकांत कांबळे
रा.मोहोळ.

तुझी माझी मैत्री By सौ.रेखा सुर्यकांत कांबळे | Best Maitri Poem In Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
तुझी माझी मैत्री By सौ.रेखा सुर्यकांत कांबळे | Best Maitri Poem In Marathi 2023