Maitri Poems in Marathi

मैत्री By सौ.Pallavi Harshad Garude | Best Maitri Poems 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.Pallavi Harshad Garude यांची -मैत्री – हि कविता -Maitri Poems- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्री By सौ.Pallavi Harshad Garude| Best Maitri Poems 2023

मैत्री | Maitri Poems 2023

मैत्री  By सौ.Pallavi Harshad Garude| Best Maitri Poems 2023

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे अत्तराची कुपी
लवंडली तरी सुवास पसरवते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे नभीचे चांदणे
मिट्ट काळोखातही वाट दाखवते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे आठवणींचे गाठोडे
उघडल्यावर हळूवार मनाला बिलगते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे श्रावणातील सर
ओल्याचिंब क्षणी इंद्रधनू साकारते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे शिंपल्यातील मोती
अलगद वेचताना भान हरपते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे ओसंडणारा धबधबा
डोळे भरून पाहील्यावर, मन तृप्त होते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे निळं आकाश
डोक्यावर मायेचं छप्पर धरते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे अथांग समुद्र
मनाच्या गाभ्यापर्यंत थेट पोहोचते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे पानांची सळसळ
आनंद आणि उत्साह यांचे प्रतीक असते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे प्राजक्ताचा सडा
अंगणी सुखाच्या पायघड्या घालते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे कान्हाचे मोरपीस
बेचैन मनाला हळूवार शांत करते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे केवड्याचं पान
मांगल्य आणि पावित्र्य यांचा सुरेख मेळ साधते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे एक निरागस कविता
ओठांवर आल्यावर, मंत्रमुग्ध करते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे आज्जीची मऊ गोधडी
कडाक्याच्या थंडीत मनाला उब देते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे आजोबांची काठी
अडचणींच्यावेळी भक्कम उभी राहते.

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे पुरणाची पोळी
शेवटपर्यंत आपला मऊपणा टिकवून ठेवते.

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे कैरीचा मुरांबा
जीवनातले आंबट गोड क्षण साजरे करते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे इंस्टावरील स्टोरी
थोडक्यात खूप काही सांगून जाते

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे मोबाईल डेटा
जुन्या नव्या आठवणींची बेगमी करते.

तुझी आणि माझी मैत्री म्हणजे सावळ्याची वारी
अंतरी सदा चैतन्य फुलवते

तुझी आणि माझी मैत्री, सुंदर गोजिरी साजिरी
अशीच आपुली प्रीती, नांदो सुखात मनमंदीरी

मैत्री By सौ.Pallavi Harshad Garude| Best Maitri Poems 2023

मैत्री  By सौ.Pallavi Harshad Garude| Best Maitri Poems 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मैत्री By सौ.Pallavi Harshad Garude| Best Maitri Poems 2023

5 thoughts on “मैत्री By सौ.Pallavi Harshad Garude | Best Maitri Poems 2023”

  1. Damini Amol Dahake

    Khupch Sundar kavita, maitri nat jaga vegl Pallavi khupch Chan shabdat tu hi kavita rekhatli aahe. Khupch Chan.

  2. Congratulations pallavi.
    Kavita,khup chan ahe.karan kavachi mandani ethakya sahaj pan manala bhural padanari vatali. Simplicity is the core ✨️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
10 ⁄ 5 =