Maitri Prem Kavita In Marathi

“काय ही मैत्री” By कुमारी.रिद्धी ज्ञानेश्वर पाटील.| Best Maitri Prem Kavita In Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.रिद्धी ज्ञानेश्वर पाटील. यांची -“काय ही मैत्री”- हि कविता -Maitri Prem Kavita In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

“काय ही मैत्री” By कुमारी.रिद्धी ज्ञानेश्वर पाटील.| Best Maitri Prem Kavita In Marathi 2023

“काय ही मैत्री” | Maitri Prem Kavita In Marathi

Best Maitri Prem Kavita In Marathi 2023

“काय ही मैत्री”…

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

जीवांची मजबूत गुंफण ती मैत्री, ओठांवर नकळत हसू येणारी ती मैत्री,
चिरकालीन अतूट साथ ती मैत्री,
कोणतही नातं नसतांना,जे नातं निर्माण होतं ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

आयुष्यातील वावटळी अंधरखाईत लोटणारी ती मैत्री,
प्रकाशमय वाटेवर आयुष्यभर सोबत चालणारी ती मैत्री,
मनमोकळ्या श्वासांची मुभा ती मैत्री,
अहो, संवादाचच दुसरं नाव ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

मनातील भाव सहज ओठांवर येणारी ती मैत्री,
रातराणीच्या सुगंधात मन मोहनारी ती मैत्री,
हातात हात नसतांना, हवीहवीशी ती साथ मैत्री,
न दिसणारी पण,मनातून शुद्ध जाणवणारी ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

दुःखात आनंदाचा सागर ती मैत्री,
आनंदात जल्लोषाचा गजर ती मैत्री,
नवचैतन्याचे झाड ती मैत्री,
उन्हाळ्यात जणू सावलीच ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री .

कोमेजलेल्या पाखराला उडण्याच बळ देणारी ती मैत्री,
इंद्रधनुष्याच्या सात रांगांसारखी अटळ ती मैत्री,
पहिल्या पावसात फुलणारं फुल ती मैत्री,
आयुष्यातल्या सगळ्याच ऋतुंची साक्षीदार ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

आकाशातल्या अगणित ताऱ्यांसारखी अगणित प्रेमळ ती मैत्री,
डोळ्यांतील अश्रुंसारखी सुख दुःखात साथ देणारी ती मैत्री,
आजारपणातलं औषध ती मैत्री,
तु काय अन् मी काय,,,सगळं काही एकच ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

आपुलकीनं दाटलेलं आभाळ ती मैत्री,
त्या आभाळातूनच कोसळणारा भरभराटीचा पाऊस ती मैत्री,
पावसानंतर येणारी स्नेहाची लाट ती मैत्री,
या सगळ्यांत सावरून घेणारी आधाराची ,हक्काची जमीन ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

भेटीचा दिवस न आठवणारी पण,आयुष्यभर न विसरणारी ती मैत्री,
भटकलेल्या मनाला योग्य वाट दाखवणारी ती मैत्री,
एकटेपणात मायेचा हात ती मैत्री,
या दीर्घ कवितेप्रमानेच आयुष्याची दीर्घ साथ ती मैत्री .

सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…
सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…
सुंदर अशा नात्याचं नाव ती मैत्री…

“काय ही मैत्री” By कुमारी.रिद्धी ज्ञानेश्वर पाटील.| Best Maitri Prem Kavita In Marathi 2023

"काय ही मैत्री" By कुमारी.रिद्धी ज्ञानेश्वर पाटील.| Best Maitri Prem Kavita In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

“काय ही मैत्री” By कुमारी.रिद्धी ज्ञानेश्वर पाटील.| Best Maitri Prem Kavita In Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *