Maitri Prem Kavita

भेटण्यास कारण लागत नाही By श्री.जयद्रथ आत्माराम आखाडे| Best Maitri Prem Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.जयद्रथ आत्माराम आखाडे यांची -भेटण्यास कारण लागत नाही – हि कविता -Maitri Prem Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

भेटण्यास कारण लागत नाही By श्री.जयद्रथ आत्माराम आखाडे| Best Maitri Prem Kavita 2023

तुझी आणि माझी मैत्री | Maitri Prem Kavita

Maitri Kavita In Marathi 2023

तुझी आणि माझी मैत्री अशी
जमली आहे युगायुगांची
आज आणि उद्याही राहिल तशी
दोघांची मिळून एक जीवाची …१

मैत्रीच्या नात्याचे अनेक प्रकार
मैत्रीची व्याख्या कळली कुणाला ?
पण टिकून राहिली आजपर्यंत
आयुष्यभर जाणवेल पुन्हा पुन्हा. ..२

तुझी आणि माझी मैत्री अशी
जुळून आली होती एका क्षणी
झालो दोघे एकमेकांचे सोबती
भेटत रहातो आपण क्षणोक्षणी …३

अनेक आहेत दोघांचेही मित्र
पण मैत्री मात्र जमली तुझ्याशी
एकमेकांच्या मिळाल्या भावना
जपून राहू या दोघे एकमेकांशी ….४

नाती असतात अतुट मैत्रीसाठी
सख्ख्या नात्याहूनही जरा वेगळी
संकटात धैर्याने उभी रहाणारी
परोपकार जोपासणारी सगळी. ..५

आपल्या मैत्रीत नाही येत कधी
जात,धर्म, पंथ आणि भेदभाव
प्रेमळ,निर्मळ,निस्वार्थ भावना
हेच आपल्या मनातील सदभाव….६

तुझी माझी मैत्री जीवाभावाची
सुख दु:ख सारे माझ्या ह्रदयात
मैत्रीचे बंध विणले रेशीमधाग्यात
तुटू नये म्हणून सावधान जपण्यात …७

असा तुझ्या-माझ्या मैत्रीचा गंध
उजळून टाकतो समाजाचे अंग
कितीही आली संकटे जीवनात
कधीच होणार नाही मैत्रीत भंग …८

हा मैत्रीतला गोडवा, माझ्या सख्या
मधासारखा राहू दे असाच मधुर
नको त्यात शंका कुशंकेचा वास
राहू नये कधीच मैत्रीतील कसूर …९

तुझ्या आणि माझ्या या मैत्रीत
भेटण्यासाठी कारण लागत नाही
आतुरता लागते, तुला नि मलाही
नाही भेटलोच तर,होते लवलाही …१०

मैत्री तुझी आणि माझी असावी
शब्दात जुळलेली कविता, निबंध
व्हावी इतिहास ती अजराअमर
नसावेत कुठेही त्याला निर्बंध ….११

बांधूया मैत्रीची एक खुणगाठ अशी
सुटू नये कुणाला,कधीच आयुष्यात
घेऊन हात हातात,साथ दोघांचीही
आजपर्यंत नसेल कुणाच्या पाहण्यात ..१२

राहू प्रेमाने सदोदित,हास्य मुखी
नको विरह, दु:ख, दुराचार मनात
उमलणा-या फुलासारखी नेहमीच
येऊ दे सुगंध,मनमोकळा आसमंतात …१३

मैत्री तुझी आणि माझी असावी कोवळया उन अन् सावलीसारखी
जरी आली संकटे आयुष्यात थोडी
तरीही वाटावी ती,नसल्यासारखी …१४

नको कुणा व्देष,दुरावा,अहंकार
शब्द असावेत आपुलकीचे गोड
जवळ असो वा दूर दूर कुठेतरी
तरी आठवणीची नकोच धरसोड…१५

मैत्री तुझी आणि माझी अशीच रहावी
स्वच्छ,शुभ्र, नितळ पाण्यासारखी
दिसून यावे प्रतिबिंब स्पष्ट निष्कलंक
नसावी मलीन,अंधुक कोमजल्यासारखी…१६

*जयद्रथ आखाडे*
त्रिवेणीनगर, तळवडे, ता. हवेली जिल्हा पुणे
मोबाईल नंबर 8888747715

भेटण्यास कारण लागत नाही By श्री.जयद्रथ आत्माराम आखाडे| Best Maitri Prem Kavita 2023

Best Maitri Prem Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

भेटण्यास कारण लागत नाही By श्री.जयद्रथ आत्माराम आखाडे| Best Maitri Prem Kavita 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
33 ⁄ 11 =