काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) यांची -” अश्रू मित्राने ढाळावे “- हि कविता -Maitri Sathi Kavita Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
*”काव्यबंध मासिक दीर्घ कविता स्पर्धा “*
*ऑगस्ट २०२३*
*दि. – १२ ऑगस्ट २०२३*
*विषय – तुझी आणि माझी मैत्री*
*काव्यप्रकार – अष्टाक्षरी*
*शीर्षक – ” अश्रू मित्राने ढाळावे “*
=======================
” अश्रू मित्राने ढाळावे ” By वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) | Best Maitri Sathi Kavita Marathi 2023
” अश्रू मित्राने ढाळावे ” | Maitri Sathi Kavita Marathi

( अष्टाक्षरी दीर्घ कविता )
तुझी आणि माझी मैत्री ,
असावीचं खूप खास..
ओढ एकमेकांसाठी ,
राहो त्यात हमखास..१
अशा सुंदर मैत्रीचा ,
वाटो सर्वांनाचं हेवा..
खाऊ आपण वाटून ,
सुख-दु:खांचाही मेवा..२
प्रश्न पडता एकाला ,
द्यावे उत्तरं दुजाने..,
राहू जीवनात दोघे ,
नित्य अशाचं स्नेहाने..३
घ्यावा आदर्श सर्वांनी ,
अशा निखळ मैत्रीचा..
अडचण आली तरी ,
मिळे सहारा खात्रीचा..४
सल एकाच्या मनाची ,
ओळखावी दुसऱ्याने..
मार्ग काढावा त्यातून ,
दोघांनीही आनंदाने..५
निंदा ऐकता मित्राची ,
राग यावा उफाळून..
वाद जुने मनातील ,
टाकावेत संपवून..६
मित्र पडता आजारी ,
जावे औषधं बनून..
जुन्या आठवांनी व्हावे ,
मन परत तरुण..७
आठवता अचानक ,
सर्व जुन्या आठवणी..
यावे नयनांत अश्रू ,
नकळत त्याच क्षणी..८
सावरावे सैरभैर ,
फिरणाऱ्या काळजाला..
द्यावी टक्कर धैर्याने ,
जीवनात संकटाला..९
कृष्ण-सुदामा सारखी ,
मैत्री असावी निर्मळ..
गैरसमजांनी तीला ,
बसू नये कधी झळ..१०
आणू नये बिलकुल ,
मैत्रीमध्ये व्यवहार..
मित्र असावा फक्त ,
स्नेहाचाच हकदार..११
वाढणाऱ्या वयासह ,
मुळे मैत्रीची वाढावी..
तुझ्या-माझ्या काळजात ,
दोस्ती हळूचं रूजावी..१२
चव असावी यारीची ,
थोडी आंबट – मधुर..
दु:ख ऐकता मित्राचं ,
वाहो नेत्रांतून पूर..१३
गरजेला हातामध्ये ,
हात मित्राचा असावा..
अनाठायी अहंकार ,
खऱ्या मैत्रीत नसावा..१४
मित्र कधी चुकताच ,
कान हक्काने धरावा..
सोबत्याच्या भेटीसाठी ,
जीव नेहमी झुरावा..१५
मनातल्या गुजगोष्टी ,
मित्राकडे उघडाव्या..
जबाबदाऱ्याही काही ,
मित्रावर सोपवाव्या..१६
भेट होताचं सख्याची ,
चिंता जावी विसरून…
आलिंगन द्यावे मित्रा ,
पद , प्रतिष्ठा सोडून..१७
निंदा कधीही दोस्ताची ,
करू नये माणसांत..
गुणगान मात्र गावे ,
सदा मित्राचे गर्वात..१८
लागू नये कुणाचीही ,
दृष्ट आपल्या मैत्रीला..
बाप्पा आहेत कायम ,
तुझ्या-माझ्या सोबतीला..१९
हास्य सदा मुखावर ,
माझ्या मित्राच्या रहावे..
घेता अंतिम निरोप ,
अश्रू मित्राने ढाळावे..२०
स्वरचयिता,
✍️… वैशाली पडवळ ( एंजल वैशू )
अहमदनगर ( अ. होळकर नगर )
📱 – ८४३३७६४२००
दि. – १२ ऑगस्ट २०२३
” अश्रू मित्राने ढाळावे ” By वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) | Best Maitri Sathi Kavita Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
” अश्रू मित्राने ढाळावे ” By वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) | Best Maitri Sathi Kavita Marathi 2023