काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.कोमल मेश्राम यांची – मैत्री- हि कविता -Maitri Sathi Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तुझी माझी मैत्री | Maitri Sathi Kavita

अलगद उभा होतास तू
तुझ्यात मग्न होतास तू
मी पाहताच तुला सावरलास तू
का कुणास ठाऊक अं
पण माझ्या मैत्रीत रमलास तू ||१||
हळूच तुला भेटायला
आलो मी जेव्हा
पुढे केला मैत्रीचा हात तू
हाताला स्पर्श मी केला तेव्हा ||२||
हजारोच्या संख्येने
जिथे गर्दी होती
स्वप्नासारखी तिथं वाट शोधत
तुझी माझी मैत्री होती ||३||
क्षणार्धात आपण तिथून दूर गेलो
काजव्या सारखा तुला
सगळीकडे मी शोधत फिरलो
आज विश्वास होऊन गेला की ,
मी या मैत्रीला पुन्हा जिंकलो ||४||
मैत्री अशी असावी जणू
काजव्यासारखी ती अंधारातही
दिसावी सुखात जरी नसली पण
दुःखात ती सोबत असावी ||५||
त्या दोघांमध्ये एक
घट्ट नातं असावं
विश्वासाचे दार त्यांच्या
मनात दिसावं ||६||
शंकेने भरलेलं मनातलं
तिथं सगळं बोलता यावं
प्रयत्न करताच हे नातं
धाग्याप्रमाणे घट्ट व्हावं ||७||
आलेच डोळ्यात अश्रू त्याला
हळुवार तू पुसावं
मन हलकं होताच ,
तु स्मित हास्याणि हसावं ||८||
कितीही माणसे आली नवीन
तरीही तू मैत्री जुनीच जपावी
या मैत्रीच्या नात्यात दोघांचीही
ओढ एकमेकांना सारखी असावी |९
आयुष्याच्या वाटेवर तुझी माझी
मैत्री अशीच फुलावी
नकळतपणे जन्मोजन्मी मला
तुझीच मैत्री मिळावी ||१०||
एक नातं तुझ्याशी माझं असावं
त्या नात्याला कोणतचं नाव नसाव
वाटेल तेवढं हृदय उलगडून
प्रेम करावं
नात्यातील प्रेम आयुष्यभर पुरावं |११|
आयुष्याच्या वाटेवर तू मिळालास नदीच्या किनाऱ्यावर नातं जोडलास
माझ्या हृदयाशी तु मैत्री केलास
न मागता ही तू ,
या मैत्रीत सगळं काही दिलास ||१२||
नेहमी मित्र बनवून रहा माझा पकडलेला हात पकडून रहा माझा आयुष्याच्या वाटेवर सोबती बन माझा जगताना नेहमी माझ्या हातात
हात असू दे तुझा ||१३||
नको हवी माझी मैत्री
मग सांग ना मला
असं रडत बसून
का दोष देतो तु स्वतःला ? |१४|
निघून जाईन रे आनंदात
तुझ्या आयुष्यातून नेहमीसाठी
तू आनंदात राहो आयुष्यात
हेच मागते आजही तुझ्यासाठी
||१५||
*✍ ~ कोमल मेश्राम*

मैत्री By कुमारी.कोमल मेश्राम | Best Maitri Sathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मैत्री By कुमारी.कोमल मेश्राम | Best Maitri Sathi Kavita 2023
Chaan lihli komal best of luck for your best future…