Maitri Var Kavita In Marathi

रेशमी बंध By सौ.सुवर्णा पवार | Best Maitri Var Kavita In Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सुवर्णा पवार यांची -रेशमी बंध – हि कविता -Maitri Var Kavita In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

रेशमी बंध By सौ.सुवर्णा पवार | Best Maitri Var Kavita In Marathi 2023

रेशमी बंध | Maitri Var Kavita In Marathi

रेशमी बंध  By सौ.सुवर्णा पवार | Best Maitri Var Kavita In Marathi 2023

माहेरी येता मला सखे तुझी आठवण यावी,
माझी जिवलग मैत्रीण आजही परत भेटावी….

सखे तुला बघून ग माझा ऊर भरून यावा,
नयनी आसवांचा पूर सतत वहात रहावा…

सासर माहेरचे माझे सुखदुःख तुला मी सांगावे,
सांगताना तू मला जवळ घेऊन माझे अश्रू पुसावे….

परत एकदा खेळावी तुझ्या सवे मी कब्बडी,
खेळताना ओढून धरावी मी तुझी तंगडी….

तुजसवे सखे रोजच बागेत फिरायला जावे,
रंगीबेरंगी फुलपांखरा सवेत स्वच्छंद बागडावे….

मैत्रीणींच्या घोळक्यात दोघी खळखळ हसावे,
दोघींच्या डोळ्यात अश्रू येई पर्यंत पळत रहावे…

बागेच्या कोपऱ्यात डोसा पाणीपुरी खावी,
पैसे देताना मात्र तुझ्या माझ्यात चढाओढ लागावी….

माझे मन सखे तुझ्या ग मैत्रीत रमते,
माझ्या भावनांचा कोंडमारा विसरून हसते…..

सखे मनातले गुपीत तुला मी सांगावे,
तुझ्या सवे मनमोकळे सतत बोलत रहावे….

तुझ्या सारखी मैत्रीण मला जन्मोजन्मी मिळावी,
सुख दुःखात नेहमी अशीच तू मला साथ द्यावी….

तुझी माझी ग भेट अशीच होत रहावी,
अशा दिवसांची सखी खूपदा मी तुझी वाट पहावी…

तुझ्या माझ्या मैत्रीचे नाते शब्दांच्याही पलीकडले ,
जीवाभावाची तूच सखी मैत्री नांवाचे पान उघडले. ….

ऋणानुबंधाची तुझी माझी मैत्री ही माझ्या जीवनात ,
फुलासम जपले त्यास ठेविले मी माझ्या ह्यदयात…..

बंध जुळला तुझ्या माझ्या मैत्रीचा हा पसरे आसमंती गंध ,
बहरे पवित्र नात्यांत दोघींच्या मधुर मैत्रीचा सुगंध …

मैत्री तुझी माझी निर्मळ वाहत्या पाण्यासारखी,
राहिली ती सतत पडणाऱ्या ऊन पावसासारखी ….

झुळूक प्रभात समयी येता तुझा होतो आभास ,
अलवार होऊनी गंधीत सखी तू भेटावे मज खास …..

तुझ्या माझ्या मैत्रीचे जुळलेत जन्मोजन्मीचे बंध,
बांधियल्या मैत्रीच्या रेशीम गाठी तुझाच मज लागे छंद …..

जीवलग मैत्रीणीची जगात एक सुंदरशी भाषा ,
तिच्या प्रेमामध्येच लपल्या जीवनातील खूप आशा …..

सखे जोडीले नात्याने तुझी माझी मैत्री रक्तांपलीकडचं,
ऋणानुबंधाच्या गाठी आपुल्या या जुळल्या अनंतापलीकडचं….

तुझ्या माझ्या मैत्रीचे देवाने बांधिले ऋणानुबंध,
आठवणीत राहतील जन्मोजन्मी तुझे माझे मैत्रीचे रेशमीबंध …

Best Maitri Var Kavita In Marathi 2023

रेशमी बंध By सौ.सुवर्णा पवार | Best Maitri Var Kavita In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

रेशमी बंध By सौ.सुवर्णा पवार | Best Maitri Var Kavita In Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
8 + 2 =