काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सौ. सुनिता कावसनकर यांची -मैञीतला परिस- हि कविता -Maitri Var Kavita Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
मैञीतला परिस By सौ. सुनिता कावसनकर| Best Maitri Var Kavita Marathi 2023
मैञीतला परिस | Maitri Var Kavita Marathi

मैञीदिन शब्द ऐकुन
अंजूच्या आठवणींनं
मन गेलं गहिवरून..
मुकलेय मी त्या परिसाला
सोन्याची झळाळी दिली
जीने जीवनाला..
पारखी झालेय मी
मैञीच्या प्रेमरूपी झर्याला..
गहिवरून अश्रु आलेत नयनाला..
कधी मैञिण कधी शिक्षिका
कधी गुरु होती अंजू..
ती जीवनाचा आधारस्तंभ होती ..
आईच्या मायेचा पाझर होती..
प्रेमळ भावनांचा सागर होती..
निराशेच्या ऊन्हामधे सावली होती..
माझ्या जीवनाचा अविभाज्य
अंग होती अंजू..
अंजू एक गोड नाव ..,
जगावेगळा होता तीचा भाव …
“अंजू” म्हणजे माझं जीवन..,
प्रेमळ मायेच गगन…
“अंजू” म्हणजे माझा श्वास..,
माझी जिव्हाळ्याची रास…
“अंजू” एक आठवण..,
प्रेमाची साठवण…
“अंजू” एक वाट..,
आयुष्यातील प्रेमळ पहिली गाठ…
“अंजू” एक गोड नांत..,
बहरणार्या जीवनाची हिरवी पात…
“अंजू” म्हणजे माझ्या आयुष्याची
अनमोल ठेव..
जीवापाड जपणारी एकमेव…
“अंजू” शिवाय सुनं मन अन् घर..
अंजू म्हणजे वात्सल्याची सर…
“अंजू”… तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..,,
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का.?
असायचे हास्य नेहमी तीच्या मूखी,
राबायची ती दिवसरात्र ठेवित
सगळ्यांना सूखी..
होती ती प्रत्येकाची पहिली
गुरु आणि सखी…
दुसऱ्याचे हितगुज हेच तिच्या ध्यानी,
चांगल्या संस्कारांची होती ती गुणी,
ती होती माझी जगत जननी ..
सौख्य मैत्रीचे जुळता
अंजूने जपला जिव्हाळा..
अंजूची मैत्री म्हणजे स्पर्श
मखमलीचा फुटे सुखांना उमाळा..
अंजूची मैञी म्हणजे कृष्ण सुदामा..
नव्हता कधीच तिथे दुःखाला थारा..
प्रेम माया आपुलकी जिव्हाळा
विश्वास जागणारा ..
खूप केलं आहेस अंजू तु माझ्यासाठी..
माझ्या अंधार्या विश्वात तु
दीपस्तंभ होवून आलीस..
मी कधीच विसरत नाही
त्या मौल्यवान क्षणांना..
मी सुवर्णाक्षरात कोरलयं
ह्रदयात त्या सुखद क्षणांना..
दिलेलं मैञीचं वचन माञ अंजूने पाळलं..
मैञीचं नातं शेवटपर्यंत निभावलं..
या आमच्या गोंडस नात्याला
माञ अंजूच्या मृत्युनेच अंतरलं..
एक प्रवास जिवलग मैञीचा..
स्वर्ग आणि पृथ्वीच्या अंतराचा..
तुझीच
सखी सुनिता
सौ. सुनिता कावसनकर
छञपती संभाजीनगर..

मैञीतला परिस By सौ.सौ. सुनिता कावसनकर| Best Maitri Var Kavita Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मैञीतला परिस By सौ.सौ. सुनिता कावसनकर| Best Maitri Var Kavita Marathi 2023
अप्रतिम!!!!! शब्द च काय भाव पण तेव्हढेच तरल, सच्चे आणि काळजाला भिडणारे🙏🙏
Khupach manala bhavli Sunita tuzi Anju barobarchi maitri anivtichya varchi Kavita…👌👌👍🏼
MATRI CHI SUNDAR KAVITA VACHLYA NANTAR MI SUDDHA MAITRICHYA VISHVAT RAMUN GELO THANKS FOR NEW WORLD OF FRIENDSHIP.
Kharach atishay sunder kavita.
Heart touching ❤️
Sunita
Khup khup chan aahe kavita, atishay bhavpurn 👌👌👌