Maitri Var Kavita

अमूल्य ठेवा By सौ.भारती राजेंद्र बागल | Best Maitri Var Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.भारती राजेंद्र बागल यांची -अमूल्य ठेवा- हि कविता -Maitri Var Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

🌹अमूल्य ठेवा🌹 Maitri Var Kavita

Best Maitri Var Kavita 2023

वेड लागावे जीवा
दिलास असा देवा
मैत्रीच्या नात्याचा
अमूल्य असा ठेवा

मैत्री तुझी माझी
खळखळत्या पाण्यासारखी
निर्मळ निरागस
पुष्पातल्या गंधासारखी

जीवनाची आस तू
पूर्णत्वाचा ध्यास तू
हृदयी मंदिराच्या गाभाऱ्यात
ईश्वराचा वास तू

तुझ्याविना मी म्हणजे
मूर्ती विन मंदिर आहे
श्वासाविन देह अन
पंखाविन पक्षीन आहे

सदाकदा माझ्या
सोबत तू असायचीस
उदास वाण्या मनात माझ्या
नित्य नवचैतन्य भरायचीस

थबकले पाऊल की
ढकलून पुढे दयायचीस
सावरायला पुन्हा तूच
क्षणात धावून यायचीस

काय सांगू मोठेपणा
तुझ्या निस्वार्थीपणाचा
झालीस पाया तूच ग
कळसास गेलेल्या आयुष्याचा

हातात घालून हात
झरझर ओढत न्यायचीस
यशाच्या शिखराचा
मार्ग मला दाखवायचीस

ढाल बनवून संकटांशी
धैर्याने लढायला शिकवायचीस
डगमगलेच पाऊल तर
स्वतः पुढे व्हायचीस

आठवण तुझी येता
आठवते भेट कृष्ण सुदाम्याची
मिटली होती ग दरी
तिथेच गरीब श्रीमंतीची

हृदयात उरली होती
फक्त निस्वार्थी मैत्री
तुझ्या प्रेमाची ग मज
त्याहून अधिक खात्री

अंधारल्या जीवनात माझ्या
झालीस आशेचा कवडसा
तुझ्याविना ना श्वास वेगळे
तू जीवनाचा हिसा

ध्यानी मनी चित्ती माझ्या
स्मरण तुझे चालते
आठवण तुझी माझ्याशी
तुझ्या सम बोलते

नित्य झालीस आधार
खचलेल्या ध्येयाला
होऊन पाया स्वतः
पोहोचवलेस
कळसाला

मन मंदिराच्या गाभाऱ्यात
तूच ईश्वर मूर्ती
अविस्मरणीय मज साठी
तुझ्या निस्वार्थीपणाची कीर्ती

उघड्या डोळ्यांना माझ्या
नित्य नव स्वप्न दाखवलस
जीवन चित्रात माझ्या
रंग आनंदाच भरलंस

नसेल ना ग ईश्वर
तुझ्याहून वेगळा
माझ्या सुखाचाच फक्त
विचार तुझ्या मनी सगळा

मंदिरात जाण्याआधी
भेट तुझी घ्यावी वाटते
प्रीत तुझ्या हृदयातली
प्रथम मला पहावी वाटते

आनंद उधळून मजवरती
दुःख लपवलेस स्वतःचे
काय सुख सांगू ग
मैत्रीच्या नात्याचे

नित्य आभार मानते
मैत्रीचं नातं निर्मिल्या ईश्वराच
याहून वेगळ काय असेल ग
सुख त्या स्वर्गीच

मैत्री तुझी माझी
रुदयात खोल रुजलेली
प्रेम गंधात भिजलेली
राधे कृष्णा सम
प्रीत ही बहरलेली

वाटते हातात देऊन हात तुझ्या
प्रत्येक श्वास घ्यावा
तुझ्याशिवाय एक क्षणही
आयुष्यात न यावा

भेटता कोणी आपुलकीचे
मन गहिवरून येते
नकळत ओठातून
गुणगान तुझे पाझरते

आठवण तुझी येता
नयन निर्झरास येथे भरती
हास्याची चादर सांग
किती पांघरू हुंदक्यांवरती

सहवासात तुझ्या
विश्व सामावले माझे
तुझ्याशिवाय काय करू
मी या मतलबी जनाचे

दूर तू जाता माझ्यापासून
घोर जीवास लागतो
एकेक श्वास माझा
सोबत तुझी मागतो

तुझ्याशिवाय सुख ही
भयावह वाटते
चिंतेचे काहूर मग
हृदयी माझ्या पेटते

वाऱ्याची चाहूल ही
ठाव काळजाचा घेते
भिरभिरती नजर माझी
फक्त तुलाच शोधत राहते

घट्ट पकडून हात तुझा
वाट जीवनाची चालावी
अन्य काहीच नाही ग
एवढीच इच्छा माझी पूर्ण व्हावी

मैत्री नसेल ग
अशी कुठे जगाच्या पाठीवर
काहीच नसताना माझे
मी हक्क सांगितला
तुझ्या प्रत्येक गोष्टीवर

हृदयाच्या कोंदनात
मी नाव तुझे कोरले
बिकटप्रसंगी देहात माझ्या
तू श्वास ही तुझे भरले

हृदया रुदयात बहरत जावा
वेल मैत्रीच्या नात्याचा
एवढाच अमूल्य ठेवा
आयुष्यात सुख आनंदाचा

तुझ्याशिवाय जग हे
सुन सुन भासतं
हास्य वदनावरती
पाणी डोळ्यात असतं

मिळतील लाखो जन्म जरी
मैत्री तुझीच मागेन
मैत्रीच्या नात्याचं सुख
जाऊन ईश्वराला सांगेन

भारती राजेंद्र बागल

अमूल्य ठेवा By सौ.भारती राजेंद्र बागल | Best Maitri Var Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
29 − 15 =