काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.कुमारी.. वैशाली गजाननराव कदम यांची -तुझी माझी मैत्री… – हि कविता -Maitri Var Marathi Poem- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तुझी माझी मैत्री… By कुमारी. वैशाली गजाननराव कदम| Best Maitri Var Marathi Poem 2023
तुझी माझी मैत्री… | Maitri Var Marathi Poem 2023

एक प्रवास आपल्या मैत्रीचा …
तो होता आपला प्रवास सहवासाचा…..
माझी तुझी मैत्री झाली अशी एका वळणावर…
अनोळखी होतो तरी विश्वास ठेवला आपण तो मैत्रीवर…
सुख दु:ख वाटुनही घेतले सोबतीने…
किती आनंदी केले होते आपले जीवन या मैत्रीने…..
कवटाळून घेतले होते दु:खाला…
आणि जागा ही दिली होती आयुष्यात त्या सु:खाला…..
वाटायच मैत्रीविंना सारे जग फिके…
जसे बागेत फुले ही उमलते …
उन्हातही मग सावली वाटायला लागली…..
आणि व्यथा ही हसु लागली…..
इतकी आपली मैत्री घट्ट झाली….
फुलासारख जपायचे कसे हे तु शिकवल….
आणि आयुष्याला सुंदर ,
कस करायच हे ही तु शिकवल…
अडचणी चा आधार झालास तु…
मैत्री चा तर भाग होतास पण ,
आयुष्याचा सुध्दा भागीदार झाला तु…
मैत्री बद्दल तुझ्या माझ्या लिहण्यासारख खुप आहे…
सोबत जरी नसलो आपण ,
तरी आपल्या मैत्रीला एक रूप आहे…
हसता हसता हसवले तु ,
रडता रडता डोळ्यातले अश्रू अलगद पुसले तु….
कधी कसली गरज भासली मला तर पाठिशी खंबीर उभा रहायचा तु….
वाईट गोष्टी पासून दुर ठेवून मला चांगल्या वळणावर घेऊन आलास तु….
प्रत्येक सु:ख दु:खाच्या क्षणाला माझ्या सोबत होतास तु…
तुझ्या सोबतीने आपल्या मैत्रीला एक वेगळेच वळण आले होते……
आपण इतके एकमेकांना जीवलग मानले होते….
मैत्री तुझी माझी निखळ आणि पवित्र होती….
सर्वच नात्याला मागे सारणारी होती…
वाटल ही नव्हत कधी मनाला की कधी तुटेल आपली मैत्री….
कारण मीच का सर्व जग पण देणार होत याची खात्री….
कधीच नव्हती तुटणार ही आपली मैत्री..
कारण बंधन असे घट्ट होते की
विणलेले ते मैत्रीचे नाते….
कधी तुटणारे नव्हते..
आणि कधी सुटणारे नव्हते….
असाच सोबत कायम हवा होतास तु….
साठवू म्हटल तो प्रवास आपल्या आठवणीचा..
पण इथेच येऊन विसावला
आणि थांबला तो प्रवास आपल्या मैत्रीचा…. !!
तुझी माझी मैत्री… By कुमारी. वैशाली गजाननराव कदम| Best Maitri Var Marathi Poem 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
तुझी माझी मैत्री… By कुमारी. वैशाली गजाननराव कदम| Best Maitri Var Marathi Poem 2023
खुप छान कविता आहे मित्रा बद्दल आदर दर्शवला आहे… 😊👏👏