काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.मनोहर गंगाराम राठोड यांची -अतूट मैत्री – हि कविता -Maitri Varti Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
अतूट मैत्री By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Maitri Varti Kavita 2023
काव्यबंध समूह आयोजित मैत्रीदिन विशेष दीर्घ कविता लेखन स्पर्धेसाठी कविता
विषय – तुझी आणि माझी मैत्री
शीर्षक – अतूट मैत्री | Maitri Varti Kavita

रक्ताचे जरी नसले
तरी जगी आहे श्रेष्ठ
तुझी माझी मैत्री
साऱ्या नात्यात बेस्ट
लहानपणी संगतीने
खेळलो जेंव्हा खेळ
तुझा नी माझाच तेंव्हा
बसायचा पक्का मेळ
सायकल शिकायची
न्यारीच होती मजा
तूट फूट झाल्यावर
मिळून भोगायचो सजा
वेळ, काळाच बंधन
नव्हत दोघांच्याही घरी
दोघांवर बरसात राही
वेळोवेळी प्रेमाच्या सरी
एकमेकाच्या संगतीने
नाचलो,हिंडलो पदोपदी
तिसऱ्याला आपल्यात
येणे जमले ना कधी
रुसलो फुगलो कित्येकदा
पण तुटली नाही यारी
एकमेकांशिवाय बेरंग
वाटे सारी दुनियादारी
डबा खाताना तुझ्याविना
उतरला ना गळ्यात घास
अबोला झाला जेंव्हा
टिकला ना आठ तास
विश्वासाची मशागत अन
जिव्हाळ्याचं खतपाणी
वाढत गेला मैत्रीचा वेल
गात गात आनंदाची गाणी
चुकला कधी जरी एक
एकट्यात ओढले कान
कमी न होऊ दिला कधी
चारचौघात आपला मान
जगलो दोघेही मन मुराद
प्रत्येक सुख घेतले वाटून
दुःखाशीही केले दोन हात
संकटाची मान छाटून
सोबत तुझी असताना
ना वाटली कशाची भीती
दोन जरी डोके आपले
एक विचार, एक नीती
जोडी आपली प्रसिद्ध
घर असो की शाळा
दोघांच्या गळ्यात पडे
हार -जितच्या माळा
ना कधी तू एकटा पुढे
ना कधी मी एकटा मागे
विश्वासाने घट्ट बांधिले
मैत्रीचे हे कच्चे धागे
गायलीच नाही आपण
कधी विरहाची गाणी
ठेच माझ्या पायाला
डोळ्यात तुझ्या पाणी
आल्या अमावस्या पौर्णिमा
केले दोघांनी सारे सहन
समजदारीने आपल्या
मैत्रीला लागले ना ग्रहण
तुझ्या संगतीनं मित्रा
सारं जग मला झकास
तू सोबत नसताना
स्वर्गसुखही लागे भकास
दूर जरी आहोत आज
मैत्री तेवढीच आहे अतूट
उदाहरण देतात सारे
पाहून आपली एकजूट
सदा सर्वकाळ मित्रा
जोडी आपली साजे
आपल्या मैत्री नात्याला
कृष्ण सुदामाही लाजे
आहे पक्का विश्वास
झाले जरी काही
मैत्री तुझी नी माझी
कधी तुटणारच नाही
आले गेले संकट किती
प्रेमाने दोस्ती भरलेली
लाख येवोत अडचणी
भेट आपली ठरलेली
राहिले ना जरी,ते दिवस
गेले बालपण,गेली जवानी
तुझी आणि माझी मैत्री मात्र
आजही ताजी तवानी……
मनोहर गंगाराम राठोड, पुसद जि यवतमाळ
मोबा. 8208861758
अतूट मैत्री By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Maitri Varti Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
अतूट मैत्री By श्री.मनोहर गंगाराम राठोड | Best Maitri Varti Kavita 2023