Maitri Vishay Kavita

फ्रेंडशिप म्हणजे काय By सौ.सुवर्णा अनिल बाबर| Best Maitri Vishay Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सुवर्णा अनिल बाबर यांची -फ्रेंडशिप म्हणजे काय- हि कविता -Maitri Vishay Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

फ्रेंडशिप म्हणजे काय By सौ.सुवर्णा अनिल बाबर| Best Maitri Vishay Kavita 2023

फ्रेंडशिप म्हणजे काय….. | Maitri Vishay Kavita

फ्रेंडशिप म्हणजे काय By सौ.सुवर्णा अनिल बाबर| Best Maitri Vishay Kavita 2023

Social media च्या दुनियेत जिथे
माणसं हरवून गेली, सारी नाती गोती विसरली
तिथेच एका नात्याची मुळं आजही घट्ट रोवली
अहो कोणत नातं काय विचारता?
फ्रेन्डशिप…. मैत्रीचं नातं….

फ्रेन्डशिप म्हणजे काय? कुणी तरी प्रश्न विचारला
मैत्री म्हणजे धकाधकीच्या जीवनात
मनाला मिळणारा हळूवार गारवा
तहानलेल्या मनाला मिळालेले थंडावा….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
मैत्री म्हणजे विश्वास
जिथे घेता येतो मोकळा श्वास
तुझ्या माझ्या जगण्याला मिळालेली नवी आस….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
मैत्री म्हणजे निरभ्र आकाश
मैत्री म्हणजे खोल समुद्र
मैत्री म्हणजे सुसाट सुटलेला वारा….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
कधी हसणं, कधी रूसणं
कधी कडाक्याच भांडण, तर
कधी प्रेमाचा महापूर….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
कधी असते शांत नितळ समुद्रा सारखी
कधी असते खवळलेल्या लाटां सारखी
तर कधी संथ वाहणाऱ्या नदी सारखी….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
तू आणि मी लावलेलं
एक छोटसं रोपटं
प्रेमाचं खतं आणि विश्वासाचं
पाणी घालून वाढवलेलं….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
मैत्री म्हणजे नुसतीचं लुड बूडं
मैत्री म्हणजे नुसत्याच खोड्या
मैत्री म्हणजे दुसरं बालपणचं….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
मैत्री म्हंजे कधी खोडकर मुलं
तर कधी समजदार डोंगर
मैत्री म्हंजे सुखाची सावली
अंधारात वाटं दखवणारी पणती….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
एका मनाचं दुसऱ्या मनाशी जोडलेलं अनोख नातं
चुकलेल्या वाटसरू ला दाखवलेली वाटं
मैत्री म्हणजे वाळवंटात सापडणारा पाण्याचा पाझर
मैत्री म्हणजे कडाक्याच्या थंडीत मिळालेली चादर….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
मैत्रीला नसतं कोणतचं बंधन
मैत्रीला असतो फक्त मुक्त संचार
मैत्रीला ना जातीचे, ना धर्माचे बंधन
मैत्रीला तर आहेत इंद्रधनूचे सात रंग….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
इथे असते फक्त प्रेम भावना
नसते इथे जागा थोडीही द्वेषाला
मैत्री देते आगळा-वेगळा आनंद मनाला
देते नवा रंग-ढंग जीवनाला….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
साजिरी गोजिरी मैत्री तुझी नी माझी
शोभते जगात भारी
फक्त तेरी मेरी यारी
आणि खड्यातं गेली दुनियादारी….

फ्रेन्डशिप म्हणजे काय?
प्रेमाचे नाते नेहमीच हरते
आणि मैत्रीचे नाते नेहमीच जिंकते
फ्रेंडशिप ची बातचं लयं न्यारी
फ्रेन्डशिपच्या व्याख्येला शब्दच पडतात कमी….

फ्रेंडशिप म्हणजे काय By सौ.सुवर्णा अनिल बाबर| Best Maitri Vishay Kavita 2023

Best Maitri Vishay Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

फ्रेंडशिप म्हणजे काय By सौ.सुवर्णा अनिल बाबर| Best Maitri Vishay Kavita 2023

8 thoughts on “फ्रेंडशिप म्हणजे काय By सौ.सुवर्णा अनिल बाबर| Best Maitri Vishay Kavita 2023”

  1. 🎉🎉 Amazing poem written by Suvrna Tai………..about Maitri…………👍🏻All the Best………😊

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
7 + 29 =