Maitri Vr Kavita Marathi

मैत्री म्हणजे काय असते ? By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Maitri Vr Kavita Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी यांची -मैत्री म्हणजे काय असते ? – हि कविता -Maitri Vr Kavita Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्री म्हणजे काय असते ? By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Maitri Vr Kavita Marathi 2023

मैत्री म्हणजे काय असते ? | Maitri Vr Kavita Marathi

मैत्री म्हणजे काय असते ?  By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Maitri Vr Kavita Marathi 2023

मैत्री म्हणजे मैत्री म्हणजे मैत्री असते ,
प्रत्येक वेळेस आपल्याला जिच्या सोबतीची खात्री असते !
ऐन समस्यांच्या वेळी पाठ दाखवणारी नसते मैत्री ,
ती तर असते अडचणींच्या पावसात आपल्यासाठी वेळेवर उघडणारी छत्री !


मैत्री असावी पारदर्शक , मनाच्या अगदी तळापर्यंत पोचणारी ,
मग भलेही असो त्या मैत्रीची भाषा मनाला कितीही बोचणारी !
जिवलग मैत्रीत नसते कधीही जीवघेणे हे तुझे अन् हे माझे ,
खऱ्या मैत्रीचे कधीही भासत नसते मनामनावर ओझे !


खऱ्या मैत्रीत एका हृदयाची साद दुसऱ्यापर्यंत आपसूक पोहोचते ,
यालाच बहुधा ही दुनिया टेलीपथीचे नाव देते !
बोचणाऱ्या मैत्रीतूनच मिळतात पंख नव्या उत्तुंग भरारीचे ,
अशी मैत्रीच भरत असते आपल्या पंखांत बळ नव्या उभारीचे !


मैत्रीमध्ये कधीही नसते जागा सॉरी आणि थँक्यू या फुटकळ शब्दांसाठी ,
या दोन शब्दांविना हृदयात जपली जाणारी मैत्रीच ठरते जगासाठी मोठी !
कधीकधी तर डोळ्यांनी समजून घेणाऱ्या मैत्रीत शब्दांनाही जागा नसते ,
डोळ्यांच्या आश्वस्त गहिऱ्या विश्वात मग मैत्रीची वेल अजूनच बहरत असते !


मैत्री असावी तर पुरुषोत्तम अशा रामासारखी ,
बालीच्या छळ कपटाला आपल्या चतुरस्त्र बुद्धीने उत्तर देणारी !


मैत्री असावी तर त्या सावळ्या कृष्णासारखी , ब्रह्मांडाची सत्ता असून देखील बालमित्र भेटल्यानंतर डोळ्यांत आनंदाश्रू येणारी !
मैत्री असावी तर गरीब तरीही प्रामाणिक सुदाम्यासारखी ,
मित्र ब्रह्मांडनायक जरी असला तरी आपले कोरडे पोहे क्षणात संपवेल असा दृढ विश्वास असणारी !


मैत्री असावी त्या वीर अर्जुनानासारखी ,
लाखोंचं सैन्य मागण्यापेक्षा त्या सैन्याचा मार्गदर्शक केशवाला मागणारी ,
मैत्री असावी तर दुर्योधनासारखी , मित्रावर अन्याय झाल्यावर जाब विचारायला पेटून उठणारी !


मैत्री असावी दानवीर कर्णासारखी , मित्राचा हक्क डावलल्यानंतर मागेपुढे न बघता शस्त्र उचलणारी !
मैत्री असावी दास हनुमंतासारखी , नितीवान अशा आपल्या स्वामीला पिडणाऱ्या शत्रूचे अवघे राज्य क्षणात भस्मसात करणारी !
समाप्त

मैत्री म्हणजे काय असते ? By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Maitri Vr Kavita Marathi 2023

Best Maitri Vr Kavita Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मैत्री म्हणजे काय असते ? By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Maitri Vr Kavita Marathi 2023

1 thought on “मैत्री म्हणजे काय असते ? By सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी | Best Maitri Vr Kavita Marathi 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
6 + 25 =