Best Maitri Vr Kavita

‘मी’ आणि ‘ती’ By सौ.सुनीता जयदीप पाटील| Best Maitri Vr Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सौ.सुनीता जयदीप पाटील यांची -मी’आणि ‘ती’- हि कविता -Maitri Vr Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मी’आणि ‘ती’ By सौ.सुनीता जयदीप पाटील| Best Maitri Vr Kavita 2023

‘मी’ आणि ‘ती’ | Maitri Vr Kavita

Friendship Maitri Kavita

बालपणीची मी आणि ती
हुंदडत होतो सर्वत्र
आम्ही दोघी होतो मैत्रिणी
काही काळ होतो एकत्र!!1!!

खो-खो आमचा होता
आवडता खेळ
सगळ्या मैत्रिणींनी याचा
घातला होता मेळ !!2!!

आवडती डिश होती आमची
कोल्हापूरची भेळ
खाण्यासाठी आम्ही आवर्जून
काढत होतो वेळ !!3!!

मैत्रीची विन आम्ही
घट्ट विणली होती
ती उसवण्यासाठी कुठे
जागाच राहिली नव्हती !!4!!

मैत्री होती आमची
खूपच खास
तिच्यासाठी माझ्या हृदयात
जागा होती खास !!5!!

ती होती माझ्या निरागस
जीवनाच हास्य
आमच्या मैत्रीत लपली होती
अनेक रहस्य !!6!!

तिच्या माझ्या मैत्रीचं
एक वळण होतं सजलं
मन होतं पावसात
कित्येकदा भिजलं !!7!!

तिची माझी मैत्री
फुलासारखी होती बहरत
जसी पाण्यात
नाव असते लहरत !!8!!

घेतला होता मी
तिचा ध्यास
ती मला सोडून जाणार नाही
ही होती मला आस !!9!!

बहरत होते आमच्या
मैत्रीचे सुखद क्षण
पण जळत होते
यावर कित्येक जण !!10!!

मनामध्ये स्फुरली होती
मैत्रीची आशा
डोळ्यांमध्ये होती फक्त
मैत्रीची भाषा !!11!!

खेळत होतो आम्ही
रोज माझ्या अंगणात
जसा गुलमोहर बहरून
येतो प्रांगणात !!12!!

देवानेच रेखाटल्या होत्या
आमच्या मैत्रीच्या तळहातावर रेषा
मैत्रीची प्रत्येक जण करतो
वेगवेगळी परिभाषा !!13!!

मैत्री तिची माझी
होती निखळ
कधीच बसू देत नव्हती
ती मला दुःखाची झळ !!14!!

सगळे विश्व व्यापून
टाकले होते आम्ही अंतरात
मैत्री जपली होती आम्ही
हृदयाच्या ज्ञान मंदिरात !!15!!

आज तिच्या आठवणींनी
भावना दाटून येतात अंतरात
इंद्रधनुचे रंग भरले होते
तिने माझ्या जीवनात !!16!!

अन अचानक शाळेतून काढले तिला
केले तिचे लग्न
मी मात्र करीअरिस्टिक
अभ्यासात झाले मग्न !!17!!

कष्ट- कष्ट-कष्ट हा
तीच्या नशिबाचा ठोका
एक दिवस मी मात्र
झाले होते प्राध्यापिका !!18!!

तिच्या नशिबी कायमचा
होता वनवा
माझी होत होती सर्वत्र
स्तुती अन वाहवा !!19!!

फक्त वाहवा ने माझे
भरणार नव्हते पोट
पण हे सांगायचं धाडसच
करीत नव्हते ओठ !!20!!

तिला हवा होता माझ्याकडून
आर्थिक आधार
मला मात्र पुरत नव्हता
माझाच पगार !!21!!

माझ्या गले लठ्ठपगाराचा मोजमाप
तिचं मन होतं करत
बिनपगारी मन माझं
मनातल्या मनातच होतं झुरत !!22!!

मी’आणि ‘ती’ By सौ.सुनीता जयदीप पाटील| Best Maitri Vr Kavita 2023

Maitri Vr Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मी’आणि ‘ती’ By सौ.सुनीता जयदीप पाटील| Best Maitri Vr Kavita 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
6 × 21 =