काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.बाळकृष्ण दत्तोत्रय घरत यांची -फ्रेंडशिप म्हणजे- हि कविता -Maitrin Kavita In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
फ्रेंडशिप म्हणजे By श्री.बाळकृष्ण दत्तोत्रय घरत | Best Maitrin Kavita In Marathi 2023
✍️काव्यबंध स्पर्ध्येसाठी कविता..
🌷✍️विषय:-फ्रेंडसीप म्हणजे…
म्हणजे मैत्री… Maitrin Kavita In Marathi

दोन ह्रुदयातिल स्पंदण;श्वास
एक ध्यास;दृढ असा विश्वास
म्हणजे मैत्री……
झूळझूळ वाहता एकसा झरा
सुगंधी दरवळणावा मंद वारा
म्हणजे मैत्री……
वेलीवरी ऊमळलेलं गंध फूल
प्रेम,जिव्हाळा,मोह;स्नेह मूळ
म्हणजे मैत्री……
भूषण,अलंकार;दागिणा खरा
जीवन प्रवाही वळण किणारा
म्हणजे मैत्री……
दोस्ती,संगत,सोबत; साथ
दोन मनजोडी पाऊलवाट
म्हणजे मैत्री…..
रक्षणी एक ढाळ;शिरस्त्राण
पारदर्शक स्वच्छ काच छान
म्हणजे मैत्री……
एक सुमधूर सुधा;मध गोड
एकच लागलेलं व्यसन;वेड
म्हणजे मैत्री…..
जी येई कामी संकटकाळी
जी टिके सदा अनंतकाळी
म्हणजे मैत्री……
एक प्रकारचे घरोबी संबंध
जया नसे ते कशाचेही बंध
म्हणजे मैत्री……
आयूष्यामधील महा टॉनिक
जी का नसे कधीच क्षणिक
म्हणजे मैत्री……
जी संकटातही राही अबाधित
जी का असे सदा सर्वव्यापित
म्हणजे मैत्री…..
बंध ते का रेषम अश्या गाठींचे
छंद ते का सदा सारे कईकांचे
म्हणजे मैत्री…..
ऐक्य,प्रेम,राग अनं भांडण मिलाप
जी टिकविण्या पडती कष्ट अमाप
म्हणजे मैत्री…..
एक प्रकारी देणगी अनं माया
जिचा त्याग तो भक्कम पाया
म्हणजे मैत्री…..
प्रेमाहून दुर्लभ असी ती शक्ती
श्रध्दा,पूजा,प्रार्थणा;भावभक्ती
म्हणजे मैत्री…..
समाधाणी गुलबकावळी फूल
लक्षणी असे विश्वासी बंध पूल
म्हणजे मैत्री….
जी सदैव संकटी उपयुक्त
नं वीर विजयी पथ;तख्त
म्हणजे मैत्री….
प्रेम नी मायेचा बाजार
एक जडलेला आजार
म्हणजे मैत्री…..
ज्यासी कोणतीच नसे उपमा
नैराश्यतेचा तात्काळ खातमा
म्हणजे मैत्री….
जी का असे सदाच अमर
जी का लोप पावी तिमीर
म्हणजे मैत्री….
जया जगी नसे कधी तोड
जणू तळहातावरील फोड
म्हणजे मैत्री…..
अनेक नाती संबंध जोड
तया कधी नसे तडजोड
म्हणजे मैत्री…..
गळ्या स्वर्ण मोती दागिणा
जिच्या राहतीअखंड खुणा
म्हणजे मैत्री….
एक कायमस्वरूपी रंग
एक अद्भूत असाच ढंग
म्हणजे मैत्री….
एक सागरी तट,तीर ; किणारा
मनी भिरभिरणारा मंदची वारा
म्हणजे मैत्री……
एक दुधावरची साय
जणुकाय आई;माय
म्हणजे मैत्री…..
जी का जीवास जीव देई
नवं चैतन्य मिळे ज्यापाई
म्हणजे मैत्री….
एक समोरी आव्हान
एक जीवका ते प्राण
म्हणजे मैत्री…..
जिला नसे कधी ते बरे मरण
जिचे करती सदा सारे स्मरण
💞😃 बी.डी.घरत/खारकोपर
पनवेल/रायगड…४१०२०६
फ्रेंडशिप म्हणजे By श्री.बाळकृष्ण दत्तोत्रय घरत | Best Maitrin Kavita In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
फ्रेंडशिप म्हणजे By श्री.बाळकृष्ण दत्तोत्रय घरत | Best Maitrin Kavita In Marathi 2023