काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कवि -गणेश जोतीराम गायकवाड यांची – प्रवास मैत्रीचा- हि कविता -Maitrin Marathi Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
प्रवास मैत्रीचा By कवि -गणेश जोतीराम गायकवाड| Best Maitrin Marathi Kavita 2023
प्रवास मैत्रीचा | Maitrin Marathi Kavita 2023

आठवणीत अजूनही तो दिवस आहे…
अचानक झालेली भेट आता रोजची
सवय आहे…
सवडीने वागणारी तु वाटली नाही,
म्हणून मैत्रीसाठी मनात संकोच राहीले नाही…
उदास असताना हसायला तु लावलं,
कोमजलेल्या फुलाला पुन्हा फुलाय लावलं…
ती आवड तो एक छंद म्हणजे ,
गोड नात्याच कारण ठरलं..
जिवनात खरं सुख मला तेव्हा कळलं…
भेटीने भेट वाढतच राहिली…
मगं दुर जाण्याची भीती वाटू लागली..
दुर होईला ना कारण लागतं…
छोटीशी चुक केल्यावर पण गुन्हेगार
झाल्यासारखं वाटतं…
प्रत्येक गुन्ह्याला माफी ईथे असते…
असेच गोड नाते आपल्या मैत्रीचे असते…
येवढ्या मोठ्या जगात शोध कशाचा घेईचा…
आपुलकी च्या शब्दाचा सहवास कुठे मिळवायचा…
सहवास तुझ्या गप्पाचा, मध्येच रूसवे फुगण्याचा..
निखळ हस्याचा जैसे नववधू च्या लाजण्याचा..
हसता हसता बोलण्याची आस लागलेली असते
या मनाला…
पण बाळ मी स्वयंपाक करते असे कारण
येते ऐकायला….
क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी…
दरवळतो सुगंध या मनी…
जैसे मोगऱ्याचे झाड लावले मैत्रीच्या अंगणी.. .
वेळेची सर्व गणिते आणि त्याचीच सर्व नियम अटी..
मग वाटते हट्ट करावा तरी कोणाच्या सोबती..
सोबत मिळाली खरी पण जरा उशीरच झाला…
याचा दोष नक्की देईचा तरी कोणाला…
काळ बराच तो वाईट होता,
त्यातून बाहेर येण्याचा मार्ग मिळतच नव्हता,
वाईट काळातून बाहेर यायला तु लावल…
विसरतो काही गोष्टी म्हणायला तु लावल…
म्हणून स्थान तुझ मनातल स्पेशलच राहिल…
चालत राहीचे वाट दिसते खरे पणाची जिथे…
फळ नक्की देईल परमात्मा तो असेल जिथे कुठे…
मैत्रीचा बाजार शोधत बसू नको रे या जगी….
निस्वार्थी मैत्री जगवायची असते स्वताच्या अंतरमनी…
जवळ असताना भान वेळेच ठेवायचं
मगं दुर गेल्यावर आठवणीत तुझ्याच रमायच….
झाले असतील मतभेद पण नाही महत्त्व त्यांना देईच..
वचन देतो तुला आयुष्यभर तुझ्या सोबत राहण्याच…
माझ्या प्रेमाला नेहमी ह्रदयातच ठेवणार…
पण तुझ्या साठी असलेली जागा नेहमी स्पेशल
राहणार…
मैत्रीचा शेवट होईल जेव्हा केव्हा
नक्कीच मला मरण आले असेल तेव्हा… !
प्रवास मैत्रीचा By कवि -गणेश जोतीराम गायकवाड| Best Maitrin Marathi Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
प्रवास मैत्रीचा By कवि -गणेश जोतीराम गायकवाड| Best Maitrin Marathi Kavita 2023