काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमार.Rahul Dada shinde यांची -जिवलग मित्र – हि कविता -Maitrin Poem In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
जिवलग मित्र By कुमार.Rahul Dada shinde | Best Maitrin Poem In Marathi 2023
जिवलग मित्र | Maitrin Poem In Marathi 2023

कल्पनेच्या पलीकडे आणि माणुसकीचा अलीकडे असलेली नाळ म्हणजेच दोस्ती
मित्रा मित्रा काय सांगू तुझ्याबद्दल काय लिहू तूच बदलले जीवन तूच बदलले आयुष्य
तूच बनवले मला चक्कर तूच शिकवले कशी द्यायची आयुष्याला टक्कर
मित्र मित्र काय बोलू तुझ्याबद्दल सुकालाही तूच आणि दुःखालाही तूच माझ्यासाठी रडला
जो आपल्या सुखा दुखामध्ये नडला त्याला तू नाही सोडला
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल जगायचं कसं हे तूच मला शिकवलं आणि आता तूच विचारतोय कसं जगायचं आयुष्य
आयुष्य तर पुस्तक आहे चल पेन आणि पेन्सिल घेऊ सोबत आयुष्याला लिहू
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल आपण केलेली मस्ती आठवते का रे तुला नसेल आठवत तर दोन मिनिटं विचार कर हुबेहूब दिवस आठवतील
तुला क्षणभर डोळ्यात पाणीही येईल पण विसरू नको मैत्रीला
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल धकाधकीचा युगामध्ये कुठे गुतला आहे तू कॉल नाही मेसेज नाही
असा कसा राहिलास रे तू वेळ काढ तुझ्यासाठी कॉल होईल आपल्यासाठी
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल मिठाविना जीवन माझे आळणी आणि तुझ्याविना मोकळी राहिली चाळणी
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल कुठे गेला आहेस तू हरवून कशामध्ये गुतलाय आणि कुठे गेलाय बहरून येणारे
आता माघारी खूप दिवस झाले आता भेटून
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल जोंधळ्याच्या भाकरी सोबत पिठल्याची असावी सोबत तर होतंय झणझणीत जेवण
आणि तुझ्याशिवाय जोडी आपली नाही जोडली जात आणि नाही आता राहिली आपल्या कांद्यालाही पात
हे मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल
आता खूप झाले तुझ्या माझ्या आयुष्यातल्या पावसातले हे पाणी एकदा चालू कर गोड मुखाने तुझी ही शब्दांची वाणी
ए मित्रा मित्रा काय लिहू तुझ्याबद्दल आता मी तुझ्यावरती चिडलो आहे आता एकदाचा फोन कर म्हणजे आपण भेटूया
आणि भेटल्यावर तीच पुढचं सहाव्या बोलूया आता मीच तुझ्यावरती चिडलोय
ए मित्रा मित्रा तुझ्याबद्दल जेवढं लिहील तेवढा कमीच पडेल

जिवलग मित्र By कुमार.Rahul Dada shinde | Best Maitrin Poem In Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
जिवलग मित्र By कुमार.Rahul Dada shinde | Best Maitrin Poem In Marathi 2023