मैत्री एक विश्वासच नातं By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best Maitrin Poem Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.रमेश अनंत चव्हाण यांची -मैत्री एक विश्वासच नातं- हि कविता -Maitrin Poem Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्री एक विश्वासच नातं By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best Maitrin Poem Marathi 2023

मैत्री एक विश्वासच नातं | Maitrin Poem Marathi

मैत्री एक विश्वासच नातं By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best Maitrin Poem Marathi 2023

तुझी माझी मैत्री अतूट सातजन्माची
सुख दुःखात कायम साथ देणारी
असलो जरी दूर एकमेकांपासूनी
स्मरणात कायम ठिकून राहणारी!!१!!

तुझी माझी मैत्री एक अतूट बंधनाची
कुठल्याही मतभेदाची वाट नसणारी
मी एकटा असताना सोबत तुझी देणारी
मी आनंदात असता हास्य तुझे असणारी!!२!!

जरी चुकलो मी कुठे नकळत असा
प्रेमाने मायेचे शाब्दिक धीर देणारी
करून लटके लाडाचे कौतून मायेने
गाळातल्या गाळी गोड हास्य करणारी!!३!!

आपली मैत्री नात्यापलिकडचं बंधन
दुःखात कधी हाकेला धावून येणारी
चुकलो जरी या जीवनी मी रस्ता
जगण्याची वेगळी दिशा दाखवणारी!!४!!

आपली मैत्री प्रेमळ भावनांची गुंफण
एक सुंदर प्रेमाची अतूट बंधनाची प्रीत
सोबतीत चालताना सप्त सुरांची साथ
सोबत असता गुणगुणणारे ओठांवर गीत!!५!!

आपल्या मैत्रीचे मीलन दोन जीवांचे
आहे भरवसा आणी विश्वासाचे कोंदण
मैत्रीच्या पलीकडील प्रेमाचे ते बंध अतूट
भाली कोरलेलं सात जन्माचे गोंदण!!६!!

कितीही दूर असू आपण एकमेकांपासून
तरीही नेहमी एकमेकांच्या राहू ह्रदयात
जवळ नसताना ही तु अगदी माझ्या
जवळ असल्याचा भास नेहमीच मनात!!७!!

पवित्र ते बंधनाचे अनमोल हे नाते
आपली मैत्री खरंच आहे खास
विसरून मी स्वतः माझ्यातच आठवतो
तुझ्या गोड आठवणींचा सहवास !!८!!

मैत्रीला कधी रंग नसतो नसते रूप
नसतो कसला भाव कसलाच गंध
सावली सारखी उभी राहून पाठीशी
देते फक्त प्रेमळ मायेचा तो सहवास!!९!!

शोधत होतो मी एक मायेचा सहारा
मिळाला तुझ्या मैत्रीचा मला किनारा
अथांग डुबलो मैत्रीत तुझ्या असा मी
जाणवला मायेचा हळुवार ओला गारवा!!१०!!

निःशब्द भावनांची मैत्री तुझी माझी
क्षणोक्षणी वेध घेती माझ्या हृदयाचा
तुझ्या हृदयाची स्पंदने अशी नकळत
ठाव घेती माझ्या प्रेमळ मनाचा!!११!!

मैत्री अशी ही आपली अतूट विश्वासाची
जन्मोजन्मीच्या गुंफलेल्या ह्या नात्याची
संपेल एकवेळ श्वास ह्या देहाचा कधीही
पण तुझी नि माझी मैत्री नाही संपायची!!१२!!

मैत्री एक विश्वासच नातं By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best Maitrin Poem Marathi 2023

Best Maitrin Poem Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मैत्री एक विश्वासच नातं By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best Maitrin Poem Marathi 2023

21 thoughts on “मैत्री एक विश्वासच नातं By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best Maitrin Poem Marathi 2023”

  1. समीर मिसाळ

    प्रत्येक नात्याचा अंत होत असतो पण मैत्रीचं नातं हे कधीच न संपणारं आहे…. आणि हे तु कवितेतून मांडलं आहेत खरंच खूप सुंदर मित्रा…. 🤝👍

  2. खूप छान कविता आहे.
    खूप आवडली.
    खरंच वाचून खूप आनंद झाला.
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    धन्यवाद

  3. प्रत्येक नात्याचा अंत होत असतो पण मैत्रीचं नातं हे कधीच न संपणारं आहे…. आणि हे तु कवितेतून मांडलं आहेत खरंच खूप सुंदर मित्रा…. 🤝👍

  4. युवराज भुवड

    मित्र म्हणजे कृती
    मित्र म्हणजे स्फूर्ती
    मित्र म्हणजे श्वास
    मित्र म्हणजे न तुटणारा विश्वास

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *