काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी. Prachi Balu Jadhav यांची -अनोखे :नाते मैत्रीचे- हि कविता -Majhe Balpan Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे.
अनोखे : नाते मैत्रीचे By कुमारी Prachi Balu Jadhav| Best Majhe Balpan Kavita 2023
अनोखे : नाते मैत्रीचे | Majhe Balpan Kavita 2023

नात्यातल्या जगातलं
एक अनमोल नातं
विश्वासाच्या विश्वातल
असं मैत्रीचं नातं
अनोळखी प्रवासात
सापडलीएक वाट नवी
वाटू लागले मग ही वाट
हृदयास आपल्या हवी
भेट आपली तशी जरा
वाईट परिस्थितीतच झाली
नकत अनेकदा भेटलो
पण मैत्री होणे राहिली
शब्दातून शब्द हे नवे
जुळत आपले गेले
नात्यास आपल्या
मैत्रीचे पवित्र नाव आले
प्रियजन माझेही आहेत
जरी खूप सारे
पण तू आणलेच मित्रा
आयुष्यात माझ्या आनंदाचे तारे
आजारपणाला मी मिठी
त्या काळात मारली
व्यथा सारी माझी तूच रे
शांततेने ऐकून घेतली
जिवलग ही परके झाले
जेव्हा माझ्या आजारपणात
तू राहीलास तरी मित्रा
कायम माझ्या सोबतीत
माझा उद्याचा चेहरा ओळखतोस
तू माझ्या डोळ्यात बघुनी
तू ऐकत जा ना यार
असं हक्काने सांगूनी
चुकते कधी माझे तेव्हा
तू चूक दाखवून देतोस
तुझा खरा मित्र आहे
म्हणून असं ओढून सांगतोस
मला आईस्क्रीम आवडते
म्हणून तू ही खातोस
आजारी पडला जरी तरी
चालतं असतं असं सांगतोस
तुझी माझी मैत्री कळत नाही
शब्दात कशी मांडावी
आपली ही मैत्री कायम
मित्रा अशीच टिकावी
आपल्या मैत्रीचा वाटतो
खूप आदर मला
कायम आनंदी राहो तू ,
हेच मागणमागणे माझे तुला
माझ्यासाठी तू मित्रा
अवकाशातला एक ध्रुवतारा
तुझाच वाटतो रे मला
कायम एकुलता एक सहारा
ओळखीचे असे अनोखे
नाते ही मैत्रीचे
रेशमी धागे हेच
आपल्या बघ आयुष्याचे
तुझे माझे मैत्रीचे
आपले एक गाव
दोस्ती ,यारी ,जिंदगी ,
मैत्रीचे अनेक नाव
रक्ताच्या बंधापेक्षाही
घट्ट हे आपले नाते
मैत्री तुम्ही आपल्या माझे
सारे आयुष्य पाहते
अनोखे नाते हे तरी
जिवलगा एक मैत्री
दोन डोळ्यांची साथ
जशी सोबत असते मैत्री
तुझी माझी मैत्री बघ
ना अतूट बंधनाची
गोष्ट ही आपल्या
खऱ्या सखोल मैत्रीची
माझ्या घरच्या नंतर तूच
माझा शेवटचा आधार
तुझ्या सोबतीमुळे घडले
माझे चांगले विचार
अनोखे : नाते मैत्रीचे By कुमारी Prachi Balu Jadhav| Best Majhe Balpan Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
अनोखे : नाते मैत्रीचे By कुमारी Prachi Balu Jadhav| Best Majhe Balpan Kavita 2023
Nice poem. I remembered my school friends after hearing it.
खूप छान 🥰
Thank you
It’s really a nice poem. It reminded me of my childhood. It used to happen like this when I met a new friend.
❤👌🏻
Nice poem