कोमल मेश्राम यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत majhi aaji kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
majhi aaji kavita in marathi
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका गुरुवारची स्पर्धा
विषय – आजीची छकुली
माझी प्रेमळ आजी | majhi aaji kavita in marathi

आजी आजोबांची आता
एकच पिढी राहिली
घराघरात ती आनंदाने
आजी-आजोबांसोबतच वाहिली |1|
बालपणीचे ते दिवस
आजी-आजोबांसोबत हसत खेळत जगले
हळूच आजी आवाज द्यायची
बस कर ग छकुली आता आजोबा थकले ||२||
आजी आजोबामुळे ज्या घराला
एक भक्कम आधार होता
एकत्र कुटुंब होतं म्हणून
सुखात संसार थाटला होता ||३||
छकुलीच्या प्रेमामुळे आजी-आजोबा
नेहमी सुखावले
विभक्त होऊन सून पोराने
आजी-आजोबांना दुखावले
||४||
म्हातारपणात नातवंड
जगण्याची उमेद ठरते
लहानपणी आई हात धरून चालायला शिकवायची
तीच क्रिया आता म्हातारपणात
आजी-आजोबांसोबत घडते
||५||
तो बालपणीचा हट्ट नेहमी
आजोबांनी पुरविला वडील रागवायचे जेव्हा
आजीने कुशीत घेऊन
छकुलीला लपविण्याचा प्रयत्न केला ||६||
सोन्याचे होते ते दिवस
जे आजी आजोबांसोबत घालविले
आठवणीचे पडसाद घेऊन
आता फक्त डोळ्यात अश्रू राहिले ||७||
~कोमल मेश्राम

majhi aaji kavita in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह