मुकेश मुकिंद स. वानखेडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत majhi aaji kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
majhi aaji kavita
काव्यबंध साहित्य मंच
आयोजित स्पर्धा
विषय :–आजीचे छकुले
इच्छापूर्ती | majhi aaji kavita

आजीबाई चे नाव होते सुंदराबाई
नेहमी असायची ती विचारात
कधी येईल माझ्या सवे खेळायला
नातवंड माझे या माझ्या घरात…..१
ईश्वराला प्रार्थना करायची
पूजा अर्चना करी विनवणी
नतमस्तक होई ज्या मंदिरी
नवसाची घाली तेथे ओवाळणी….२
हाक ऐकली परमेश्वरानी
जुळी नातवंडे जन्मास आली
हर्षित झालीया खूप आजीबाई
बघताच डोळ्याची पारणे फिटली…..३
राहो सुखी माझी नातवंडे सैदेव
हिच इच्छा मनात बागळली
देऊनी त्यांना आशीर्वाद कायमचा
इच्छेची पूर्ती करुनी देवलोकी गेली..४

मुकेश मुकिंद स. वानखेडे
नागपूर
१४/०९/२०२३
majhi aaji kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह