Makai Chivda recipe in Marathi

Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा

ह्या ब्लॉगमध्ये आपण थोडासा वेगळ्या प्रकारचा चिवडा करून पाहणार आहोत तो म्हणजे मक्याच्या पोह्याचा चिवडा. काही प्रकारचे चिवडे करताना पोहे भाजून घ्यावे लागतात. पण या प्रकारात आपल्याला मका पोहे तळून घ्यावे लागतात. त्यामुळेच चिवडा जरा चटपटीत होतो. खाण्य्साही मस्त येते. यातच जर चाट मसाला घातला तर सोन्याहून पिवळे ! दिवाळीच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी मक्याचा पोह्याचा चिवडा करण्याची पद्धत आहे चला तर आपण पण बघूया हा चिवडा कशाप्रकारे केला जातो.
Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा

साहित्य

एक पाकीट मक्याचे पोहे.
दीड वाटी शेंगदाणे एक वाटी खोबऱ्याचे काप.
एक वाटी सोयाबीनचे गोल चाका सारखे किंवा चौकोनी खिडकीच्या आकाराचे गोळे
चिरलेला कढीपत्ता एक वाटी .

Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा

चवीनुसार तिखट मीठ.
थोडी पिठीसाखर
अंदाजे तेल आणि
फोडणीचे साहित्य यामध्ये हिंग हळद आणि मोहरी यांचा समावेश होतो. मुद्दामच ह्या सर्वांची मात्रा दिलेली नाही कारण प्रत्येकाच्या घरात असणार्या खाण्याच्या सवयी नुसार ती वेगवेगळी असलेली आढळून येईल.

Makai Chivda recipe in Marathi | मक्याच्या पोह्याचा चिवडा

Makai Chivda recipe in Marathi कृती

गॅस वरती एक मध्यम आकाराची कढई ठेवा त्यात तेल तापायला ठेवावे. त्यानंतर पोहे तळायची गाळणी घेऊन त्यात एक मूठ मक्याचे पोहे टाकून ते तळून घ्यावे. तळल्यानंतर एक कागद पसरवून त्यावरती हे तळलेले मक्याचे पोहे पसरून टाकावे. फोडणी आपण नंतर करणार अशाच प्रकारे उरलेले मक्याचे पोहे एक एक मूठ तळून काढावेत. आणि कागदावर पसरून ठेवावे. त्यानंतर सोयाबीन शेंगदाणे खोबऱ्याचे काप एकत्र करून ते तेलातून परतवून घ्यावे. हे सर्व मक्याच्या पोह्यांवर पसरून टाकावे. आता आवडीनुसार तिखट मीठ पिठीसाखर आणि थोडी जिऱ्याची पावडर पोह्यावरती पसरवून टाकावी.

आता फोडणी करायला घ्यावी त्यासाठी थोडे तेल घेऊन एका मोठ्या कढईत कडीपत्ता टाकावा त्यात हिंग हळद मोहरी एकत्र करून थोडेसे तळण्यासाठी ठेवावे फोडणी व्यवस्थित झाल्यावरती त्यात कागदावरील तळलेले पोहे शेंगदाणे आणि खोबऱ्या सकट मोठ्या कढईमध्ये टाकावे आणि गॅस बारीक ठेवून हे सर्व मिश्रण सारखा रंग सगळीकडे येईपर्यंत परतावे.

तुम्हाला माझी आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
17 + 16 =