Makar Sankranti 2022

Makar Sankranti 2022:- तारीख आणि माहिती

खास गोष्ट म्हणजे Makar Sankranti इंग्रजी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे नवीन वर्षातील पहिलाच सण असतो आणि १४ जानेवारी रोजी साजरी केली जाते. परंतु कधीकधी हा संक्रांतीचा सण १५ जानेवारी रोजी पण साजरा केला जातो, हे फक्त लीप वर्षातच होत.
२०२२ हे वर्ष नसल्यामुळे आपण १४ जानेवारी २०२२ रोजीच संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत….
…..Makar Sankranti 2022:- तारीख आणि माहिती
…..मकर संक्रांति कब है
…..makar sankranti information
…..makar sankranti baby photoshoot

मकर संक्रांती म्हणजे काय ?

“तिल-गुळ घ्या आणि गोड गोड बोला”
एका राशीपासून दुसर्‍या राशीपर्यंत जो सूर्याचा संक्रमण काळ असतो त्याला संक्रांती किंवा संक्रांत असे म्हणतात. आणि पहिल्या संक्रांतीपासून दुसर्‍या संक्रांती पर्यंतच्या काळाला सौर महिना किंवा माह असे म्हणतात. असे एकूण 12 (बारा) सूर्य संक्रांती आहेत, परंतु त्यापैकी मेष, कर्क, तुला आणि मकरसंक्रांती या प्रमुख आहेत. या सणाची मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थानाशी संबंध आहे. सूर्य मकर राशीचा उष्णकटिबंध ओलांडतो,म्हणजेच तो मकर वृतावर असतो तो दिवस १४ जानेवारी आहे . आणि आपण हा दिवस मकर संक्रांतीचा उत्सव म्हणून साजरा करतो. दुसरी बाजू पहिली तर या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणात सूर्याची हालचाल सुरू होते.म्हणून या दिवसाला मकरसंक्रांत या नावाने ओळखले जाते.

मकर संक्रांत या दिवसाचे महत्त्व-

जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हंटले जाते. या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांती पासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास (महिना) म्हणून ओळखला जातो.
मकरसंक्रांत या दिवशी सूर्य उत्तरायनात प्रवेश करत असतो . म्हणूनच याला उत्तरायणी उत्सव असे पण म्हटले जाते.
भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत आणि याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो .
या दिवशी तप ,जप, तपश्चर्या, ध्यान आणि धार्मिक विधी याला पण खूप अधिक महत्त्व आहे. तसेच या दिवसाला कापणीचा दिवस किंवा सण असे देखील म्हटले जाते. .

मकर संक्रांत Makar Sankranti 2022

मकरसंक्रांती या दिवसा अगोदर सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धांवर त्याची किरणे टाकतो. त्यामुळे दक्षिणगोलार्धांत रात्र मोठी असते आणि उत्तर गोलार्धात दिवस लहान असतो . आणि या कारणामुळे थंडीचा हंगाम चालू असतो. या दिवसापासूनच सूर्य पृथ्वीच्या उत्तरगोलार्धांमध्ये जाऊ लागतो. यामुळे हवामानात बदल होतात आणि हे शेतकऱ्याच्या पिकांसाठी फायदेशीर असतात . आपला भारत देश हा कृषिप्रधान ( शेतीप्रधान) देश आहे. त्यामुळे आपले सण-उत्सव शेतीवर प्रामुख्याने अवलंबून आहेत. आणि मकरसंक्रांत हा सण अशा काळात येतो जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक जसे मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात.आणि ह्या सगळ्या मुळे शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते. या दिवशी, तिल आणि गूळाचे पदार्थ देऊन लोक एकमेकांना “तिल-गुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणतात. महाराष्ट्रातील महिलांसाठी हा खास दिवस आहे. जेव्हा विवाहित महिला अतिथींना “हळद कुमकुम” या नावाने आमंत्रित करतात आणि त्यांना काही वस्तू ” वाण “म्हणून देतात.

असं मानतात कि मकरसंक्रांत या दिवशी स्वर्गाचे दार किंवा कवाड उघडते. मकरसंक्रांतीपासून शुभ दिवसांची सुरुवात होते असे मानले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिणगोलार्धातून उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडले जाते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा आणि पुण्यापेक्षा अधिक फलदायी असते.

…..Makar Sankranti 2022:- तारीख आणि माहिती
…..मकर संक्रांति कब है
…..makar sankranti information

…..makar sankranti baby photoshoot

Beautiful Babyphotoshoot for Makarsanranti

मकरसंक्रांत हा दिवस असा साजरा करावा …..

मकर संक्रांतीच्या शुभ दिनी सकाळी पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करावे, तसेच या दिवशी काहीतरी दान करण्याला पण विशेष महत्त्व आहे.
यानंतर सूर्याला जल अर्पण केल्यानंतर, त्याची पूजा केली जाते . आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना केली जाते.
या नंतर गूळ, तीळ, त्याचे पदार्थ , फळे इत्यादींचे पण दान केले जाते. तसेच या दिवशी सगळ्या लहान आणि मोठ्यांचा आवडीचा पतंगही दिवसभर उडविला जातो . कारण यामुळे सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडतात आणि त्यातून आपलया शरीराला लागणारे “ड ” हे जीवनसत्व मिळते.

मकरसंक्रांत हि प्रत्येक प्रांतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. परंतु प्रत्येक ठिकाणी तिचे नाव वेगळे आहे . आणि तिथल्या रीती नुसार ती साजरी पण केली जाते.

उत्तर प्रदेश मध्ये याला खिचडीचा सण म्हणो किंवा तामिळनाडूचा पोंगल ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मकरसंक्रममा म्हणू देत किंवा तेलगू त्याला ‘ पांडुगा’ म्हणू देत .गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण.आणि मध्य प्रदेशात मकरसंक्रांतीच्या उत्सवाला सकृत म्हणून ओळखले जाते.केरळमध्ये तर या दिवशी तिथले लोक ४0 दिवसांच्या धार्मिक विधीचा उत्सव म्हणून साजरा करतात .
.पंजाबमध्ये लोह्री या नावाने ओळखलं जाते, आणि काश्मीरमध्ये शिशूरला संक्रांत .अशी कितीतरी वेगवेगळी नावं असली तरी त्यामध्ये साधर्म्य आहे.
जशी आपल्या विविधतेत एकता आहे अगदी तशी ………

…..Makar Sankranti 2022:- तारीख आणि माहिती
…..मकर संक्रांति कब है
…..makar sankranti information

…..makar sankranti baby photoshoot

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *