Marathi Birthday Wishes

Marathi Birthday Wishes: Marathi Messages

 वाढदिवस हा आपल्या जीवनाची सुरुवात आणि आनंद अधोरेखित करणारा असा खास दिवस आहे.वाढदिवसा दिवशी आलेला प्रत्येक संदेश (Birthday Wishes) हा आपले नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम हे द्विगुणित करणारा असतो.वाढदिवस म्हटल की शुभेच्छा (Wishes) ह्या आल्याच. आपल्या लाडक्या ,जवळच्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा (Wishes )आपण देतो .सगळीकडून ह्या शुभेच्छांचा जणू वर्षावच सुरू असतो. त्यात शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं.आम्हीही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जास्तीत जास्त Marathi Birthday Wishes वाढदिवसाच्या शुभेच्छांचा (Birthday Wishes) अप्रतिम असा खजिना …तो ही मराठी मध्ये… Marathi Birthday wishes only friend , husband.  

जन्मदिनाच्या या शुभ क्षणांनी,
सारी स्वप्नं आपली साकार व्हावी..
वाढदिवस आजचा आपल्यासाठी
एक अनमोल अशी आठवण ठरावी..
त्या अनमोल आठवणीने आपलं सगळं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ..!

उगवता हा सुर्य तुम्हाला
भरभरून आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले सदा
प्रेमळ सुगंध देवो,
परमेश्वर आपणांस
सदैव सुख-समाधानात ठेवो… Marathi Birthday wishes only friend , husband.

उत्कर्षाची शिखरे सर तुम्ही करावी,
वळून पाहता कधी आमची शुभेच्छा स्मरावी ,
तुमच्या आयष्यात सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत,
आयुष्यात सुख , आनंद ,यश लाभु देत,
सगळं मनासारखं घडू देत…

Best B-day msg In Marathi : मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आकाशातील लखलखते तारे ,
सळसळते मंद वारे,
इंद्रधनूचा झुला तुझ्याचसाठी
उभे हे सारे…वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवनवी क्षितिजे नवीन पहाट,
फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर सदैव राहो,
लाखो सूर्य तुमच्या पाठीशी तळपत राहो..

तुमच्या आयुष्याच्या या पायरीवर
नव्या जगातील तुमच्या
नव्या स्वप्नांना बहर येऊ देत .
तुमच्या सगळ्या इच्छा ,आकांक्षा,
उंचच उंच भरारी घेऊ देत
एकच इच्छा फक्त आमच्या मनात ,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभू देत …वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या नकळत आपण एकमेकांशी नातं जोडतो,
त्यातली सगळीच नाती ही आपलयासाठी नसतात .
काही नाती ही क्षणांची असतात , तर काही व्यवहाराची,
असं एखादं नातं आपण त्यामध्ये जोडतो,
जे नात्यांचा खरा अर्थ आपल्याला सांगतं
असंच नातं जोडलेल्या अशा प्रेमळ व्यक्तिमत्वाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या …

Birthday Msg In Marathi:वाढदिवसाचे सर्वोत्तम संदेश

काहीजण स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र फार प्रामाणिक आणि सच्ची असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही,
म्हणूनच तुमच्यासाठी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट,विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा आहे… Marathi Birthday wishes

हिऱ्याप्रमाणे सदैव चमकत राहो
आपल्या चांगल्या कर्तुत्वाची ख्याती
जिव्हाळा , स्नेह वृद्धिंगत व्हावी
मनामनाची सगळी नाती…

ओठावर असतं, तुझं नाव
रोज सकाळ आणि संध्याकाळ
तू आहेस आमचा अभिमान
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान
संकल्प असावेत तुझे नवे
मिळाव्यात नव्या दिशा
पूर्ण व्हावे तुझे प्रत्येक स्वप्न..

नवा गंध , नवा आनंद निर्माण करीत
आयुष्यातला प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी ,नव्या वैभवानी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्या …

Marathi Birthday Wish : वाढदिवसाच्या शुभेच्छा

झेप घ्या गरुडासारखी
पाहणाऱ्यांच्या ही माना दुखाव्यात,
आकाशाला गवसणी घालावी अशी
की .. पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान मिळवा असे की,
सागर अचंबितच व्हावा
एवढी प्रगती करा की
काळ ही पहात राहावा
कर्तुत्वाच्या अग्निबानाने
धेय्याचे गगन भेदून
लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभेच्छा …

वर्षाचे ३६५ दिवस,५२ आठवडे
महिन्याचे 30 दिवस ४ आठवडे
आठवड्याचे ७ दिवस..
आणि माझा सगळ्यात आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा … Marathi Birthday wishes

Marathi Birthday Wishes

तुझा वाढदिवस म्हणजे
झुळझुळ आनंदाचा झरा,
सळसळ करणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या जिवनात कधीच
दुःखाची सर नसावी,
आपली ओंजळ प्रत्येक क्षणी
सुखानेच भरलेली असावी.
देवाने इतकी खुशी तुम्हाला द्यावी …
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आयुष्यातला प्रत्येक क्षण, क्षणभर आपला असतो
आणि क्षणातच तो परकाही होतो
क्षण मोलाचे हे जगून घे ,सारे काही मागून घे,
जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती दे…

आयुष्याच्या शिदोरीत आहे सुखदुःखाचा वाटा
कधी संथ प्रवाह सुखांचा, कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा
मोलाचा आहे प्रत्येक क्षण, तू क्षणभर जरा जगून घे
आयुष्याची आव्हाने अशीच पेलत भ्रांत उद्याची सोडून दे…

तुझ्या सुख – समृद्धीच्या
सागराला किनारा नसावा ,
तुझ्या आनंदाची फुलं ही
सदैव बहरलेली असावीत …

तुम्हीही तुमच्या मित्र-मैत्रिणींना ,नातेवाईकांना ,अगदी जवळच्या व्यक्तींना आणि जीवनसाथीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका .

Author:-Mrs. Swati Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *