Shodh marathi book

Marathi Book Shodh Review- “शोध” (लेखक:- मुरलीधर खैरनार)

Marathi Book Shodh Review- “शोध” (लेखक:- मुरलीधर खैरनार)

पुस्तकाचे नाव:- शोध! (लेखक:- मुरलीधर खैरनार)

ही गोष्ट आहे एका हरवलेल्या स्वराज्यातल्या खजिन्याची,

आपण वाचनाचे शौकीन असाल आणि तुम्हाला adventure-thriller आवडत असेल तर, ही भूक भागवण्यासाठी तुम्हाला इंग्लिश गरजेचं असत कारण thrillerच्या वाटेवर मराठी लेखक सहसा जात नाहीत. मराठीत अनेक विषयांवर लेखन होत, मराठी लेखक शब्दांसोबत प्रेक्षकांच्या भावनांशी इतकं विलक्षण खेळतात की त्या कथेची गुंगी अनेक दिवस उतरत नाही. पण जेव्हा विषय अंगावर काटा आणणाऱ्या थ्रिलर चा असतो, तेव्हा मराठी कमी पडते असा माझा समज होता.
इंग्लिश लेखकांसारख मराठीत कुणी असा प्रयत्न का करत नाही? कारण त्यासाठी हवा असतो खूप मोठा अभ्यास खांदे मोडणारी मेहनत आणि इतकं करूनही भागत नाही तिथे लागते सातत्य दशकभराच निरंतर सातत्य. मग इतका वेळेचा खर्च करून देखील कथानक फसल तर सगळं मुसळ केरात आणि त्यात मराठीतला वाचनवर्ग कमी म्हणून लेखक इतका उपद्व्याप करत बसत नाही. पण तरी देखील अशा दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या मराठी वाचक वर्गासाठी शेवटचा समजून काही लेखकांनी प्रयत्न केला. थ्रिलर, इतिहासाचा दांडगा अभ्यास, खूप खोल संशोधन, एकाचवेळी
आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याची खटपट काही मोजक्या लेखकांनी केली त्यातलेच एक ‘मुरलीधर खैरनार’.
त्यांनी अनेक वर्षे मनात एक कथानक पेरून अनेक मराठी इंग्रजी ग्रंथाचे खत-पाणी देऊन प्रसंगी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गल्लीबोळात स्वतः फिरून एक अपत्य जन्मास घातलं त्याचेच नाव ‘शोध’.
‘शोध’ ची कथा शिवकाळापासून चालत वर्तमानात आणून सोडते,
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उद्धारासाठी अनेक ठिकाणी लुटालूट केली, पण फक्त लूट मिळवणे इतकाच त्यांचा हेतू नव्हता त्यात मोठं राजकारण होत १६६१ साली राजापुरची वखार लुटली कारण पन्हाळ्याला वेढा पडला तेव्हा हेन्री रेव्हिंटन याने सिद्दी जौहरला लांब पल्याच्या तोफा देऊन पन्हाळा जिंकण्यास मदत केली, सुरतचे बंदर हे मुघलांचा समुद्रातून जगभरात व्यापाराचा प्रमुख मार्ग तो मोघलांच्या इलाख्यातून हिसकावून कल्याण प्रांतात, आपल्या स्वराज्यात यावं ह्यासाठी त्यांनी सुरत लुटली, एकदा नाही दोनदा १६६४ आणि १६७० साली.

Marathi Book Shodh Review- “शोध” (लेखक:- मुरलीधर खैरनार)

इ.स. १६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत योजनाबद्धरितीने दुसऱ्यांदा सुरत लुटली. लुट होण्याच्या एक ते दीड वर्षांपूर्वीच बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेरांनी सुरत शहरातील व्यापारव्यवस्थेची खडानखडा माहिती गोळा केली होती; परिणामी या लुटीतून प्राप्त झालेला ऐवज एवढा प्रचंड होता की, त्यानंतर सुरतेमधील आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाला तो कायमचाच ! लुटलेला हा ऐवज बारा हजार जनावरांवर लादून मराठा सैन्याचा विशाल काफिला सुरतेहून स्वराज्याकडे रवाना झाला. औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याला ही खबर मिळाली व त्याने ताबडतोब त्याचा सरदार दौलतखान याला शिवरायांना अडवण्यासाठी धाडलं. दौलतखान सैन्यासह वैजापूरहून निघाला. त्याला हुलकावणी देण्यासाठी मराठा सरदारांनी एक योजना आखली. त्यांनी लुटीचा ऐवज व फौजफाटा दोन तुकड्यांमध्ये विभागला. यापैकी पाच हजार जनावरांवर लादलेला ऐवज घेऊन पहिली तुकडी सुरक्षितपणे स्वराज्यात पोहोचली; मात्र दुसऱ्या तुकडीतील एकही सैनिक स्वराज्यात पोहोचला नाही ! या दुसऱ्या तुकडीच्या प्रमुख सरदाराचं नाव होतं, गोंदाजी नारो ! दोन हजार सैनिकांच्या या तुकडीसोबत सात हजार घोड्यांवर लादलेला लुटीचा अमाप ऐवज होता; या संपत्तीची आजच्या काळातील किंमत आहे, २५ लाख कोटी रुपये !

Marathi Book Shodh Review

Marathi Book Shodh Review- “शोध” (लेखक:- मुरलीधर खैरनार)

दुर्दैवानं गोंदाजी मुघलांच्या हाती लागला, त्याचे सर्व मराठा सैनिक मुघलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. कैद करून त्याला औरंगाबाद येथे नेण्यात आलं.
तत्पूर्वी, ‘आपण पकडले जाणार’ हे गोंदाजीनं ओळखलं होतं, लुटीचा सर्व ऐवज त्यानं अटक होण्यापूर्वीच कुठल्याश्या डोंगरामधील अज्ञात जागेत लपवून ठेवला. तो ऐवज जिथे लपवला त्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अनेक अत्याचार झाले, पण शेवटच्या श्वासापर्यंत गोंदाजीनं ती माहिती कोणालाही सांगितली नाही. अखेर कैदेत असतांनाच गोंदाजीचा मृत्यू झाला; तो ऐवज जिथे दडवून ठेवला होता; त्या जागेचा ठावठिकाणा लिहिलेलं पत्र शिवरायांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्याने स्वतःच्या मृत्यूपूर्वीच करून ठेवली होती. पण त्याची ही योजना काही यशस्वी झाली नाही. कालांतरानं शिवरायांचं निधन झालं. आणि तो खजिना गुप्त राहिला तो आजतागायत !
गोंदाजीच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर स्वतः महाराज काही माणसं नेमून ही गोंदाजीने लपवलेली लूट शोधण्याचा प्रयत्न करतात, महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे तो प्रयत्न पुढे चालू ठेवतात. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावरच्या औरंगजेबाच्या संकटाच्या धामधुमीत हा खजिना विस्मरणास जातो, पेशवे देखील ह्या फंदात पडत नाहीत त्यामुळे तो खजिना तसाच दडून राहतो आणि कथानक साडेतीनशे वर्षे पुढे ढकललं जात.
ही कहाणी आहे, साडे तीनशे वर्षांपूर्वी गोंदाजीने एका अज्ञात जागी दडवलेल्या त्या खजिन्याच्या आजच्या काळातील शोधाची !

Marathi Book Shodh Review- “शोध” (लेखक:- मुरलीधर खैरनार)

शिवकालीन अस्सल संदर्भ, वर्तमानातील सत्य प्रवृत्ती, महाराष्ट्रातील खरीखुरी गावे, शहरे व परिसर यांचं तपशिलवार वर्णन करून लिहिलेली ही कथा ! लेखकाने स्वतःचा सगळा अभ्यास संशोधन लावून सलग बहात्तर तासांचा हा वेगवान घटनाक्रम; इतिहास, वास्तव आणि कल्पनाविलास यांची अनोखी सरमिसळ ! तीन दिवसांच्या घडामोडीत अनेक संदर्भ शिवकालीन ब्रिटिश कालीन देऊन कथेत जीवंनतपणा आणतो.
ह्या प्रचंड खजिन्याचा शोध घेणारे सुद्धा ३५०वर्षा पासूनचा इतिहास घेऊनच जगताणा आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यात ‘उद्धारक समाज’ असेल, ‘खोजनार’ असतील किंवा मग अगदी शेवटच्या पानावर सापडणारा ‘शिलेदार’ असेल. प्रत्येकाचे मार्ग वेगळे उद्देश्य वेगळी पण लक्ष मात्र एकच.

Marathi Book Shodh Review- “शोध” (लेखक:- मुरलीधर खैरनार)

मग काय होत त्या खजिन्याच? कुठे सापडतो इतका प्रचंड खजिना! कसा लागतो ‘शोध’! शिवकालीन खजिन्याचा?

#शोध!
एक अशी गुंतागुंत जी वाचतांना Mystery, Crime, Friendship, Adventure, Chasing आणि Romance इत्यादी गोष्टींची अनुभूती येते. या कथेसाठी लेखकांनी केलेला आधुनिक तंत्रज्ञानविषयक अभ्यास वाचनातून आपल्या प्रत्ययास येतो.

प्रत्येक इतिहासप्रेमींनी शिवप्रेमींनी काहीतरी भन्नाट वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे!

Author – Vikram Rasal

आमचे इतर महत्वाचे ब्लॉग वाचा

CLICK FOR FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 4

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 − 9 =