सौ. स्वरुपा कुलकर्णी आणि वीणा पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi charoli on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
marathi charoli on life
काव्यबंध समुह आयोजित स्पर्धा,
विषय- आयुष्य
आयुष्यावर बोलू काही | marathi charoli on life

आयुष्य सुंदर आहे खरे रे,
डोळे उघडून पहा जरा,
उमललेली कळी कालची,
फुल बनले कसे अहा!!…
काळ्याशार मातीमधुनी,
रंग किती साकारती,
हिरव्या हिरव्या माळरानी,
सूख डोलते वाऱ्याशी…
रंग जाई-जुईचा निर्मळ,
गुलाब- बकुळीचा तो पहा,
गंध-रूप किती वेगळे,
निसर्ग नटला किती अहा!!…
सुंदर पाखरे किती पहावी,
जाती त्यांच्या किती किती,
प्रत्येकाचे ध्येय निराळे,
त्यांच्यासवे तू होई पक्षी …
समुद्र लाटा असती अनंत,
तरी न ओलांडी कधी बंधन,
मनुष्य प्राणी किती लहानसा,
विशाल त्याच्यासमोर पहा…
पाऊस येई घेऊन साऱ्या,
मनमुक्त त्या सरीवर सरी,
मनमोकळे भिजून घेशी,
निसर्गाची किमया सारी…
निरागस ते बाळ चिमुकले,
बोल बोबडे त्याचे सुंदर,
मन होई किती अनावर,
घ्याया पापी त्याची सत्वर….
तरूण -तरूणींची कुजबूज,
प्रेम तयांचे किती अलवार,
तूही घे शोध जगात ह्या,
खरे प्रेम ते कुठले भूवर…
आयुष्य हे सरते भरभर,
काळवेळ ती जाई लवकर,
तूच जीवनाचा शिल्पकार,
जीवन करी तू एक महोत्सव…
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
राहाता,अहमदनगर
marathi charoli on life
काव्य बंध समुह आयोजित स्पर्धा
1/10/23
विषय… आयुष्य
काय मिळवायचे | marathi charoli on life

मानव जन्म हा मिळाला
जगू आयुष्य आनंदाने
भाग्यवान समजू स्वतःस
मिळे सारे भगवंताच्या कृपेने…1
नको ते गाऊस रडगाणे
येईल त्या संकटास तोंड द्यावे
हार जीत ठरलेलीच असते
हसतमुखाने सामोरे जावावे…2
दुसर-याचे सुख पाहून
नको मन खिन्न देऊस होऊन
दुसर-याच्या सुखात रमून जावे
आपलं सगळं दुःख विसरून….3
हे स्पर्धेचे आहे सध्या युग
कष्ट ,जिद्द, चिकाटी ठेवावी
आयुष्य आहे हे क्षणभंगुर
पुढे पाऊल टाकत धाव घ्यावी…..4
आयुष्यात काय मिळवायचे
हे अगोदर घ्यावे जाणून
धन ,दौलत ,गाडी ,बंगला
इथेच सारे जायचं टाकून…5
चार शब्द प्रेमाने बोलावे
जमेल तेवढी करावी मदत
आयुष्याची नको लावू विल्हेवाट
आनंद घेत रहावे हर गोष्टीत…6
कधीच म्हणू नये स्वतःस
कमनशिबी आहोत आपण
सत्कर्म करून मिळवावी पुण्याई
बघा होईल आयुष्याचं सोनं….7
मिळेल फुरसत तेव्हा करावे
ईश्वराचे सतत नामस्मरण
तोची परमानंद जीवनातला
हेची ठेवावे सदोदित स्मरण…8
वीणा.पाटील कोल्हापूर

marathi charoli on life
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह