प्रेमाबद्दल अनेक तक्रारी होतात. तुम्ही म्हणाल काय झाल हिला आज अशी का बोलते? सुरुवातच तक्रारीने केली! नक्कीच तक्रारीने केलीये सुरुवात. पण त्यालाही एक कारण आहे. मी असे कित्त्येकजण पहिले आहेत जे प्रियकर, प्रेयसी किंवा आपला नवरा, बायको बद्दल सारखे तक्रार करत असतात. आणि गम्मत म्हणजे प्रेम खूप आहे पण तक्रार पण खूप असते. मुळात मला वाटत खर्या प्रेमात तक्रार नसते. कारण तिन्जेव्हा निर्माण होते तेव्हाच ती सोडवली जाते. त्यासाठी हवे असते ते निसंकोच मत मांडण्याच धैर्य. “तू कसा किंवा कशी वागल्याने मला तक्रार आहे?” हे जर दोघांनी एकत्र येऊन शांतपणे समजावून घेतलं तर नक्कीच तक्रारी कमी होतील. आणि नाते अगदी घट्ट होईल. असा विचार करताना मला वाटले जर एका प्रेयसीला किंवा बायकोला जर तिच्या प्रेमाबाद्दल्च्या अपेक्षा आपल्या प्रियकराला किंवा नवर्याला सांगायच्या असतील तर ती कसे सांगेल? आणि मी कवितेतून त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या कवितेत एका कडव्याचा पुढच्याशी थेट असा संबंध नसल्याने तुम्ही तिला चारोळी संग्रह म्हणून देखील गृहीत धरू शकता.
Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? मराठी चारोळ्या
Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? मराठी चारोळ्या
नको करू प्रेम वेड्यासारखा,आवर तुझ्या वेड्या भावनेला
नको करू अतिरेक भावनेचा, मुकशील प्रेमाच्या अस्तित्वाला

वाटते भिती प्रेमाच्या भरतीची, वाहुनी जाईन त्या महापूरात
असूदे प्रेम निर्झरा खळखळणारा,धुंद होईन त्याच्या संगीतात
Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? मराठी चारोळ्या
भयभित करते तूफान प्रेमाच, होऊन जाईन मी त्यात उध्वस्त
असूदे प्रेम धुंद मंद वारा, जाईन शहारूनी त्या सुखद स्पर्शात
थरकाप करे आग प्रेमाची, वणवा होऊनी करेल मज भस्मसात
असूदे प्रेम समईतली ज्योत, जाईन न्हाऊनी त्या मंद प्रकाशात
थिजवी प्रेमाची अतिवृष्टी, होऊनी जलमय गुदमरेल जीव त्यात
असूदे प्रेम श्रावणी जलधारा, भिजुनी जाईन इंद्रधनुच्या रंगात
Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? प्रेम कविता मराठी चारोळ्या दाखवा
प्रेम असूदे स्पटिकासम नितळ, सप्त सूरांचं सुरेल गाणं |
अविचारांचा स्पर्श न ज्याला ते बाळ निरागस गोड शहाणं ||
प्रेमात असते आतुरता, नसतो मोह स्पर्शाचा |
भौतिक सुखाच्या पलीकडचा, प्रवास अंतर्मनांचा ||
Marathi Charolya Prem Kavita | प्रेम कसे असावे ? प्रेम कविता मराठी चारोळ्या दाखवा
प्रेम असते हळवे करणारे, जोडीदाराचे दुःख समजून घेणारे |
चार घटका गेल्या तरी, न विरणार्या आठवणीत रमणारे ||
तुम्हाला माझी आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा.