Marathi Farmer Poems

शेतकरी बाप आणि जगाचा पोशिंदा | 2 Best Marathi Farmer Poems

गणेश जोतीराम गायकवाड आणि वर्षा फटकाळे वराडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Farmer Poems विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतकरी बाप | Marathi Farmer Poems

काव्यबंध समूह आयोजित गुरूवारीय
काव्यलतिका स्पर्धेसाठी
दिनांक : ३१/०८/२०२३
विषय : शेतकरी
शीर्षक : शेतकरी बाप …

शेतकरी बाप आणि जगाचा पोशिंदा | 2 Best Marathi Farmer Poems

सुरूवात ही पहाटेची बापाला माझ्या
आस लागलेली सदा शेताच्या वाटेची…
वाट धरून निघाला जगाचा या पोशिंदा
सदा डोक्यावर त्याच्या लोकांचे पोट भरण्याचा अजेंडा..

विसरून भुक स्वताच्या पोटाची…
जादू करतो तो जगाची भुक भागवण्याची..
आयुष्याची करून माती,
बियाणे लावतो भूमीच्या पोटी
तरी पावसाच्या रूसण्याने काहीच लागत नाही हाती…

भरून ओती या जगाची..
दिवसरात्र राबतो तो आमच्या साठी…
बाप आहे रे…. तो आपचा
खुप दु:ख वाटत त्याच्या साठी….

जाण राहू द्या रे त्याच्या उपकाराची
येवढीच एक अपेक्षा आहे तुमच्या पाशी….


राबतो तो शेतात राहतो तो घरात…
मन मात्र त्याच सदा त्या नदीच्या खोऱ्यात…

त्याशिवाय जगाला पर्याय नाही कोणता
अंत नक्कीच होईल जगाचा नाही म्हणता म्हणता…

गणेश जोतीराम गायकवाड

हडपसर

जगाचा पोशिंदा | Marathi Farmer Poems

काव्य बंध समूह आम्ही मराठीचे शिल्पकार समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धेसाठी
विषय :- शेतकरी
शीर्षक जगाचा पोशिंदा

जगाचा पोशिंदा | 2 Best Marathi Farmer Poems

शेत शिवार फुलली
ओल्या मातीच्या गर्भात
होऊ कृतज्ञ बळीचे
राही सदैव कर्मात

रान हिरवे हिरवे
मोद मनात साठतो
दान मोतींचे देताना
कंठ आनंदे दाटतो

मिळे किंमत मोलाची
कन्यादान स्वप्न मनी
होई जगाचा पोशिंदा
खरा पुण्यकर्म धनी

ऋतू बदल होताचि
अधोगती शिवारास
मूक रुदन बळीचे
सोडी सुखाचीच आस

फास जवळ करीतो
त्याचे कुटुंब एकटे
नियतीचा घाव तीव्र
झेली अनंत संकटे

देऊ त्यास रास्त भाव
उतराई होण्या करू
काळया आईच्या लेकाचे
हात संकटात धरू

✒️©️वर्षा फटकाळे वराडे ठाणे

Best Marathi Farmer Poems

Marathi Farmer Poems

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
24 + 1 =