सौ. सुनीता जयदीप पाटील यांनी काव्यलतिका या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Kavita for Grandchild विषयावर सादर केलेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
नात | Marathi Kavita for Grandchild
काव्य बंध समूह
काव्य लतिका स्पर्धा
विषय :- आजीची छकुली
दिनांक :- 14 /9/ 2023
शीर्षक :- नात
नात | Marathi Kavita for Grandchild

खिन्न बोचरा उदास
भाव नाहीसा झाला
आज आजीच्या घरी
सोनियाचा दिवस आला !!1!!
गोंडस गोरी पान
नात जन्माला आली
आज मनाने आजी
तृप्त होती झाली !!2!!
दुडू दुडू नात जेव्हा
चालू लागली
नातीच्या मागे पळून
आजीची तहानभूक भागली !!3!!
स्वरा आजीची होती
लाडकी नात
तिच्याशिवाय आजी
एकही घास नव्हती खात !!4!!
दोघींनाही एकमेकींचा
लागला होता लळा
तिच्याशिवाय आजीचे मन
पळत होते सळासळा !!5!!
नातीच्या मागे पळून
आजी कधीच नव्हती दमत
दिवस रात्र ती तिच्या
आठवणीत होती रमत !!6!!
नात होती आजीच्या
घराची शान
आजी तिच्यासाठी
करी जिवाचे रान !!7!!
आजीच बनली होती
तिची माय
जशी असते सुंदर
दुधावर साय !!8!!
जीवनात आजीच्या
आली होती गोडी
धन्य ती आजी आणि
नाती ची जोडी !!9!!
आजी माझी आता
गावी राहते
व्हिडिओ कॉल करून
मला रोज पाहते !!10!!
अशी सुंदर आजी
सर्वांना मिळो
जीवनाचा अर्थ पुन्हा
नव्याने कळो !!11!!
✍️ सौ. सुनीता जयदीप पाटील
कल्याण मुंबई
CELL:- 9920450871

नात | Marathi Kavita for Grandchild
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
नात | Marathi Kavita for Grandchild