नातवांची हुशारी | best marathi kavita on ajoba 2023

नातवांची हुशारी | best marathi kavita on ajoba 2023

राजेश साबळे ओतूरकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on ajoba विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi kavita on ajoba

काव्य बंध समूह आयोजित,
काव्यलतिका स्पर्धा २०२३
गुरुवारचा उपक्रम
विषय:- आजोबांचा छकुली

best marathi kavita on ajoba 2023

नातवांची हुशारी | marathi kavita on ajoba

अथर्व आणि आर्यन
माझे नातू दोन खास!
गोष्ट आजोबाची दोघा,
ऐकण्याची असे आस!!

नोकरीत आई बाप,
त्यांचे असतात व्यस्त!
अभ्यास करता दोघे,
गप्पा मारतात मस्त!!

इंग्रजी शाळेत दोघे,
लोक घरात अडाणी!
ग्रहपाठ काय त्यांचा,
पहात नाहीत कोणी!!

आपापला अभ्यास ते,
करतात दोघे छान!
मैदानी खेळात दोघे,
मिळवती बहुमान!!

जुन्या पुराण्या गोष्टीत,
त्यांना रस लई भारी!
कृष्ण पांचालीला म्हणे,
कुठून आणतो साडी!!

रामायणात दगड,
पाण्यावर तरंगले!
प्रश्न ऐकून पोरांचे,
आजोबाच हादरले!!

गोष्ट सांगून आजोबा,
स्वतःच असे फसले
लिंबोणीच्या झाडाखाली,
चंद्रयान ना दिसले!!

पृथ्वी गोल फिरे म्हणे,
ती दिसत कशी नाही!
चालताना कोणी कसे,
खाली का पडत नाही!!

समजून सांगताना,
आजोबांची लागे वाट!
कुठून पडली म्हणे,
नातवांशी आता गाठ!!

हुशार हल्लीची पोरं,
आजोबांच्या ही म्होरं!
चंद्रावर गेलं यान,
म्हणे काही नाही खर!!

डोक्याला डोकं लावून,
विचार करती फार!
नव्या जुन्या नात्याची ते,
जोडून देतात तार!!

राजेश साबळे,ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे)

marathi kavita on ajoba

marathi kavita on ajoba

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *