marathi kavita on life image

आयुष्य एक कोडं आणि आयुष्य जगणं अवघडच | 2 Best marathi kavita on life image

सौ. भारती गाडगिलवार आणि कु. कोमल साखळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on life image विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi kavita on life image

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका काव्य स्पर्धा
दि : १/१०/२३
विषय : आयुष्य

आयुष्य एक कोडं | marathi kavita on life image

आयुष्य एक कोडं आणि आयुष्य जगणं अवघडच | 2 Best marathi kavita on life image

आयुष्य एकदाच मिळते
जगून घ्यावं मनसोक्त
आयुष्यावर बोलणारे
रचती कल्पनेचे मनोरे फक्त….!१!

वास्तविक पाहता
आयुष्य एक कोडं
कुणा ना सुटलेलं ज्यास
प्रारब्ध नि कर्माचं वेढं….!२!

जीवनाच्या मंचावर
प्रेम, माया, ममता, स्वार्थ,
हेवेदावे, वाद, कलहाचे रंग
लावून साधू पाहतो परमार्थ….!३!

आयुष्याचे तीन अंक
सकाळ, दुपार, संध्याकाळ
लळा, जिव्हाळा, ध्येय, स्वप्न,
भिती, शान व्यापले सर्वकाळ….!४!

प्रत्येक गोष्टीची व्याप्ती, मर्यादा
कधी क्षणभंगूर, कधी अमर्यादित
जाणताही भौतिक सुखाच्या मागे
स्पर्धा समान धावती सारे सदोदित….!५!

आयुष्याची पाऊलवाट
संघर्ष नि संकटात रंगलेली
कष्ट, मेहनत, आत्मविश्वास,
प्राक्तन नि कर्माच्या रंगी भिजलेली….!६!

दुःख चटके बसल्याशिवाय
सुखाला महत्त्व येत नाही
तम गर्भातूनच उदय आशेचा
जाणताही आसवं गाळत राही….!७!

आयुष्य कधी अनाकलनीय,
तर कधी रम्य, सुंदर, मनोहारी
प्रत्येक क्षणात आनंद शोधला
कोडी सुटतील क्षणात सारी….!८!

सौ. भारती गाडगिलवार, चंद्रपूर

marathi kavita on life image

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा…
दिनांक:-१/१०/२०२३
विषय:-आयुष्य..

आयुष्य जगणं अवघडच | marathi kavita on life image

आयुष्य जगणं अवघडच | 2 Best marathi kavita on life image

आयुष्य जगणं अवघडच
असतं बरेचसे प्रश्न उद्भवतात
त्यांना तोंड द्यावचं लागतं
शेवट पर्यंत जगावच लागतं.

आयुष्याचा गुंता सोडवता
सोडवता आयुष्य शेवटाला
येत मात्र गुंता काही सुटेना
आयुष्याचा प्रश्न काही मिटेना.

जणू आयुष्य एक प्रश्न
चिन्हचं आहे.आयुष्याच
उत्तर शोधायला आयुष्य
पणाला लावावचं लागतं.

आयुष्य जगत असताना
अनेक वादळही येत असतात
मात्र त्यांना हद्द पार करण्याचं
सामर्थ्यही ठेवावचं लागतं.

आयुष्याच्या वाटेत पाऊलो
पाऊली संघर्ष करावाच
लागतो. आयुष्य जगण्याचा
मंत्रचं जणू संघर्ष असतो.

आयुष्यात काही शुभचिंतक
तर काही निंदक ही
असतात हे स्मरणात ठेऊन
आयुष्य जगायचं असतं.

गगनी झेप घेतांना वाटेतं
आयुष्याचे पंख छाटणारे
असतात .मात्र थांबायच नसतं
गगनाला भिडायच असतं.

आयुष्यात अपयश येतच
असतं मात्र त्याला खचायच
नसतं .अपयशावर मात करून
यशाचं शिखर गाठायचं असतं.

आयुष्य जगत असतांना
कंबर कसाविच लागते मनगट

पोलादी ठेवावीच लागते. येणाऱ्या
वादळांना समोर जावचं लागते.

कु. कोमल वसंतराव साखळे
तळेगाव (शा.पं.) ता. आष्टी,जि.वर्धा.

Best marathi kavita on life image

marathi kavita on life image

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *