marathi kavita on life

आयुष्य जगतांना आणि जीवनाचा अर्थ | 2 best marathi kavita on life

सौ. सुवर्णा बाबर आणि रजनी घाटुर्ले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi kavita on life

स्पर्धेसाठी स्वरचित कविता
“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “
रविवार दि. – १/१०/२०२३
विषय – ” आयुष्य “


आयुष्य जगताना | marathi kavita on life


आयुष्य जगतांना आणि जीवनाचा अर्थ | 2 best marathi kavita on life

जन्म आणि मृत्यूच्या
मधला काळ म्हणजे आयुष्य
आयुष्य जगताना केलेला
उद्याचा विचार म्हणजे भविष्य

आयुष्याच्या वाटेवर चालताना
येती हजार संकटे
मात करूनी साऱ्यांवर
चालावी वाट एकट्याने

सुख-दु:खाचा चाले
खेळ पाठशिवणीचा
कधी यश तर कधी अपयश
हाच खरा जमा खर्च जगण्याचा

आयुष्य जगावं असं की
यशाचं अत्तर पसरावं
पचवून अपयश सार
करावी सुरुवात नव्यानं

नाती-गोती भलताच मोठा पसारा
उमजत ना कसा सावरावा
प्रेम, राग, लोभ, द्वेष, मत्सर
पसारा किती तो आवरावा

आयुष्याच्या गणितात
दुःखाची करून वजाबाकी
गुणाकार सुखाचा करावा
करावी बेरीज प्रयत्नांची

आयुष्य आहेच परी सुंदर
डोळा भरूनी पहावे, हसूनी जगावे
कशाला हवेत हेवे-दावे
सोडून सारे इथेच एकले आहे जायचे

विसावून जरा वळणावर आयुष्याच्या
पहावे वळून एकदा मागे
झाले गेले सोडून सारे
गाणे आयुष्याचे नव्याने गुणगुणावे

मिळते एकदाच आयुष्य हे
जगावे आनंद भरले
सोडून जावे वारे आठवणींचे
परी किर्ती रुपी मागे उरावे


सौ. सुवर्णा बाबर, पुणे

marathi kavita on life

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
रविवार दिनांक 1/10 /2023

जीवनाचा अर्थ | marathi kavita on life

जीवनाचा अर्थ | 2 best marathi kavita on life

आयुष्य म्हणजे काय तर
जन्म ते मृत्यूपर्यंतचे हरएक क्षण
जीवनाचा अर्थ कळते अनुभवल्यावर
भरली असते ओंजळ सुखदुःखान

चांगले वाईट कळते मोठे झाल्यावर
बालपणी चुका माफ अज्ञानपणान
जबाबदारीची रेल्वे सुरू झाल्यावर
कळून येते कर्तव्याचे शहाणपण

कुटुंबाची साखळी विवाह झाल्यावर
आनंद टिकण्यास बोलभाषेत नियंत्रण
समाजात वावरताना मिळे मित्रपरिवार
प्रत्येकाशी आपुलकीने जपावे समाजमन

करू नये कधी मत्सर अहंकार
वागू नये कोणाशी सुडाच्या भावनेनं
आळा घालावा शंकेखोर मनावर
घरोघरी बाग बहरेल सुखशांतीनं

सर्वांना कळते जीवन हे क्षणभंगुर
आज भेट झाली उद्या भरोसा नाही नं!
मग नसावा मनी दुष्कर्माचा सागर
आत्मसुख मिळेल संकटी सहकार्य दिल्यान

आई-बाबांमुळे दुनिया दिसल्यावर
वृद्धावस्थेत का हाकलावे पोरासूनेनं ?
या कृत्याने कलंक येते माणुसकीवर
विभक्त कुटुंब पैशाच्या लालचीनं

आयुष्यात संघर्षाच्या उंबरठ्यावर
घरीदारी आपणच त्रास देतोय दुर्बुद्धीन
करतोय सज्जनांचे अश्रू अनावर
हिरावतोय गुलाबी सुखाचं मानवी नंदनवन

जगी शिक्षण प्रमाण वाढल्यावर
प्रश्न पडते कुठे हरवले समजेचे मन
ह्यांना बोकाळल स्वार्थान मग काय होणार?
सांगून गेलेय खरं खरं वैचारिक अंतर्मन .

रजनी घाटुर्ले
उमरेड नागपूर

best marathi kavita on life

marathi kavita on life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *