एक कर्तव्यदार बाप | marathi kavita on vadil

एक कर्तव्यदार बाप | Best marathi kavita on vadil in 2023

रमेश अनंत चव्हाण यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on vadil विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi kavita on vadil

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
दर रविवारी स्पर्धा दिनांक:-१५/१०/२०२३

marathi kavita on vadil

एक कर्तव्यदार बाप | marathi kavita on vadil

कष्ट करून स्वतःची झिजवतो काया
कुटुंबाच्या सुखासाठी दिनरात झगडतो
त्याच्या सुखात स्वतःचं सूख मानतो
तो एक कर्तव्यदार बाप असतो!!१!!

स्वतः राहून साधा जीवन जगतो
आनंदाने मुला बाळांची हौस भागवतो
सगळ्यांना ममतारुपी जीव लावतो
तो एक कर्तव्यदार बाप असतो!!२!!

फाटलेल्या सदर्याला ठिगल्या लावतो
उसावलेल्या नशीबाला घामाने शिवतो
आलेले दुःख मुकाट्याने एकटाच झेलतो
तो एक कर्तव्यदार बाप असतो!!३!!

प्रत्येक येणाऱ्या वादळा झेलण्यासाठी
बाप मुकाट्याने एकटा निडर उभा राहतो
कुटुंबावर आलेल्या संकटाला सामोरी जातो
तो एक कर्तव्यदार बाप असतो!!४!!

आभाळाहून उंच आमच्या बापाचे कर्तव्य
त्याच्या घामाच्या थेंबाने आयुष्य घडवितो
स्वतः राबुनी आमचे जीवन घडवतो
तो एक कर्तव्यदार बाप असतो!!५!!

मुलीच लग्न असो किव्हा मुलाचं शिक्षण
पैसे खर्च करण्या कधीच नाही डगमगतो
काहीच कमी नको पडण्यासाठी धडपड करतो
तो एक कर्तव्यदार बाप असतो!!६!!

रमेश अनंत चव्हाण
तोंडली

marathi kavita on vadil

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *