काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Shubhangi shivaji shelke यांची -माझ न ऐकनारा.. – हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Marathi Kavita Paus आहे

शांत असलेल मन अचानक बावरल,
तो बरसला आणि पुन्हा मग सावरल.
तुझ्या वर लिहिताना खूप काही आठवल,
मग तुझ्या आठवनिना डोळयात मी साठवल.
दुरचा तो तसा नेहमीच यायचा,
जाताना मात्र सगळ्याना समृद् धी देवुन जायचा.
तुझ माझ नात दरवर्षी असच घट्ट व्हायच,
तुला माझ्या विना जराही नाही रहायच.
थोडा हट्टी तसा तो खूप गोड होता;
माझं न ऐकनारा अवखळ तो बरसनारा पाऊस होता.
रागावला तो माझ्या वर म्हणून इतका बसतोय,
थांब म्हणते तरी, तो जास्त च सरसावतोय.
तुझा रुसवा काढन, आता माझ्या हद्दीत नाही राहिल,
फक्त तुझ्या रागामुळ सगळ विश्व न्हाहिल.
दया का येत नाही, तुला नक्कीच हदय नसतात,
सांगूनही एकत नाही, जा आता मी पन तुझ्या वर रूसनार…
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
Marathi Kavita Paus पाऊस

लोक पावसाबद्दल कविता लिहितात कारण ते खोल भावनांना उत्तेजित करते आणि आपल्या मानवी स्वभावाशी जोडते. पाऊस नॉस्टॅल्जिया आणि शांततेपासून खिन्नता आणि आनंदापर्यंत अनेक प्रकारच्या भावना जागृत करतो. ज्या प्रकारे ते लँडस्केप बदलते, पृथ्वीचे पोषण करते आणि वनस्पतींचे पुनरुज्जीवन करते, जीवन आणि नूतनीकरणाच्या चक्रांना प्रतिबिंबित करते.
छतावर आणि पानांवरील पावसाच्या थेंबांचा आनंददायक आवाज कवींना शब्दांसह त्याची लय पुन्हा तयार करण्यास प्रेरित करतो. आवाज अनेकदा आत्मनिरीक्षण आणि चिंतनाकडे नेतो, कारण कवी त्यांच्या विचार आणि भावनांचा शोध घेतात.
पाऊस हे कवितेतील एक शक्तिशाली रूपक आहे, जे शुद्धीकरण, नूतनीकरण आणि आशा यांचे प्रतीक आहे. दुसरीकडे, ते जीवनातील गुंतागुंत प्रतिबिंबित करून अलगाव आणि दुःखाचे प्रतिनिधित्व करू शकते.
पावसाबद्दल लिहिल्याने कवींना क्षणभंगुर क्षण आणि सामान्यांचे सौंदर्य टिपता येते. हे एक सार्वत्रिक कनेक्शन तयार करते कारण पाऊस हा संस्कृती आणि काळातील एक सामायिक अनुभव आहे. कवितेद्वारे, लोकांना सांत्वन मिळते, भावना सोडतात आणि निसर्गाचे चमत्कार साजरे करतात. आणि पावसाच्या पुनरागमनाप्रमाणेच कविता पिढ्यानपिढ्या टिकते.
Loved it!.
Wow 👍✨