रंग हे जीवनाचे आणि माझं आयुष्य | 2 Best marathi language poem on life

रंग हे जीवनाचे आणि माझं आयुष्य | 2 Best marathi language poem on life

सौ. भक्ती संकेत केंजळे आणि ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi language poem on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi language poem on life

काव्यबंद समूह आयोजित स्पर्धा
विषय- आयुष्य
दिनांक 1 ऑक्टोबर 2023

रंग हे जीवनाचे | marathi language poem on life

रंग हे जीवनाचे | marathi language poem on life

आयुष्य तुझे माझे
आयुष्य सर्वांचेच सगळे
नको इथे हेवे दावे
रुसणे फुगणे निराळे

आयुष्यातील नात्यांना
बांधतो प्रेमाचा धागा
त्यात गुंफावे मन हे
हो तू पुन्हा जागा

आयुष्यातील डाव हा
चार घडीचाच सारा
नको नुसती मस्ती
दुःखाचा हा पसारा

येऊ दे आयुष्यातील
तो मौजमजेचा काळ
नीरस जीवनातही मग
फुलांचा दरवळ

आयुष्य हे एकदाच येते
जीव ओतून प्रेम कर
लढण्यात तुझी ही शक्ती
पाण्यात सगळी वाहणार

आयुष्यात आहेत अनेक टप्पे
विजयाचा आहे नारा
न्हाऊन घे वात्सल्याने
दरवळू दे गंध सारा

आयुष्य हे माणसांचे आहे सारे
व्यापून घे त्यांना तुझ्या अंतकरणात
भगवंतांचे स्वरूप हे त्यांचे
प्रेम हे फक्त विलीनीकरणात

सौ भक्ती संकेत केंजळे
करंजे पुणे

marathi language poem on life

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
वार : रविवार ०१।१०।२०२३
वेळ : रात्रीच्या ११:५९ पर्यंत.
विषय~आयुष्य

माझं आयुष्य | marathi language poem on life

माझं आयुष्य | marathi language poem on life

कष्ट करून करून माझे शरीर झिजले तरी चालेल ॥
आयुष्यात लाचारी स्वीकारणार नाही स्वप्न थिजले तरी चालेल ॥धृ.॥


कुठेही फुकटात अपेक्षा करणे मला चांगलं दिसत नाही ।
फायद्यासाठी पायावर झुकणं माझ्या तत्त्वात बसत नाही ॥
दुःखाचा उद्रेक होऊन माझे डोळे भिजले तरी चालेल ॥१॥


मनाला चांगले संस्कार देऊन सततं बोधत राहील मी ।
दुःखाच्या गर्दीतून वाट काढीत सुखाला शोधत राहील मी ॥
जगता जगता आयुष्याचे बारा वाजले तरी चालेल ॥२॥


जीवनात संघर्ष करता करता जितावं लागतं हरावं लागतं ।
आपण आयुष्यात कसं जगायचं आपणच आपलं ठरावं लागतं ॥
खोट्याने मोठं होण्यापेक्षा दिवाळं वाजलं तरी चालेल ॥३॥


स्वच्छ विचार अन निर्मळ मन याचचं मला महत्व आहे ।
आई-वडिलांचे संस्कार हेच माझं जीवनसत्व आहे ॥
साऱ्या आयुष्यात सुखाचं बीज नाही रुजलं तरी चालेल ॥४॥

ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे.
भालगांव . छत्रपती संभाजीनगर.

आयुष्य | marathi language poem on life

marathi language poem on life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *