marathi love poem for gf in 2024

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi love poem for gf in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्य स्पर्धा दि.१०/३/२४
विषय -ऑनलाइन प्रेम

शीर्षक – प्रेमाची हमी | marathi love poem for gf in 2024

कोरोनाने शिकवले जगाला
कसे करावे ऑनलाईन प्रेम
लांबूनच पहा जवळचे नाते
झालेला ज्याचा फोटो फ्रेम..(१)

शाळा,कॉलेज सारे बंद बंद
रिकाम्या वेळेचा सुळसुळाट
सर्वजण घरात होते बसले
विषाणू फिरत होता मोकाट..(२)

ऑनलाईन प्रेमामध्ये प्रेमी
पूर्णपणे गुंतून गेले प्रेमात
दुरून डोंगर साजरे जणू
खरोखर राहिले ते भ्रमात..(३)

मोबाईल झाला दोघांत दुवा
व्यक्त व्हायचे फक्त स्वप्नात
गप्पा गोष्टी आयुष्यभराच्या
प्रेम करावे मनातल्या मनात..(४)

ऑनलाईन संवाद चालतांना
प्रत्येक गोष्ट सांगायची संधी
रोजच ठरवायचे दोघांनीही
पण भेटण्यास नाही अवधी..(५)

मागच्या पिढीला न कळणार
ऑनलाईन प्रेमाची ही गंमत
चांगले वाईट काहीही म्हणा
ज्याचे त्याचे असे वेगळे मत..(६)

अडथळ्यांची शर्यत येते कधी
मोबाईलचा येत नाही आवाज
एकमेकांवर आवाज वाढवून
दोघेही होतात एकदम नाराज..(७)

चारचाकीचे युग आले तरीही
आगळीच मजा देते सायकल
ऑनलाईन प्रेम हे काळानुरूप
प्रत्यक्ष भेटण्यात दिसतो कल..(८)

क्षणाक्षणाला फोटो रेलचेल
कळत नाही काय अंतर्मनात
शब्दांची जादू चाले कधीतरी
आनंद मावत नाही गगनात..(९)

ऑनलाईन प्रेम करा खरेखुरे
आनंदाने हसत राहा नेहमी
एकमेकांच्या सुखातच शोधा
अन् द्या आगळ्या प्रेमाची हमी..(१०)

*अरविंद कुळकर्णी*
*मलकापूर*

marathi love poem for gf in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *