वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi love poem shayari in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा.
दि.१०/३/२०२४
विषय-ऑनलाइन प्रेम.

वास्तव | marathi love poem shayari in 2024

सर्वत्र बोलबाला,
मोबाईल इंटनेटचा,
तासन तास पाहतो,
जमाना मोबाईल लॅपटॉपचा…१

ऑनलाईन कामात,
व्यस्त असताना,
नको तितके मॅसेज,
गरज नसताना…२

गेम्स, दुसऱ्याचे स्टेटस,
यातून सुरू चॅटिंग,
बोलता बोलता घडते,
आपुलकीची करतात बॅटिंग…३

ऑनलाईन फोटो,
असतो सुंदर खूप,
वयाचं नसते बंधन,
पाहतो नयनी रूप…४

ऑनलाईन आवाजात गोडवा,
भुरळ पडते मधुर आवाजाला,
रंग बहर गोड गोड गप्पाचा,
छान छान पाठवितात इमोजीला…५

आकंठ बुडतो प्रेमात,
सतत फोनवर गप्पा,
हसणे आणि बोलणे,
ओलांडतो संस्कारांचा टप्पा…६

प्रेमावर,कवी, कवयित्री,
किती छान कविता लिहितात,
वाचताना आणि ऐकताना,
अंगावर शहारे येतात…७

कधी शिरलो प्रेमरसात,
शब्दांची भाषा नसते,
सुंदर प्रेमाचे वर्णन,
आपोआपच फुलून येते…८

प्रत्येकालाच हवंअसतं प्रेम,
कुठूनही का?मिळेना,
वेळ कसा छान जातो,
भूल भूल्लैया थापा कळेना…९

ऑनलाईन प्रेमात नसते विश्वासार्हता,
असते जास्त फसवाफसवी,
प्रेमात पडल्यानंतर होते,
फोन उचलण्याची टोलवाटोलवी…१०

ऑनलाईन प्रेमात बेजबाबदार,
खरे- खोटे कळत नसते,
दिसते ते सर्व ‌वरवरचे,
मैत्रीच्या नावाखाली चाळे असते…११

ऑनलाईन प्रेमाच वेगळे‌‌ रूप,
देईल का जन्माची‌ साथ,
पडेल का? उपयोगी गरजेवेळी,
नको ऐनवेळी अपुलाच घात…१२

खरचं असेल एखाद्याचे प्रेम,
राहू दे सुख जीवनी‌ निरंतर,
ऑनलाईन मधून ‌यावे वास्तवात,
पडू नये कधीच त्यांच्यात अंतर…१३

मंगल राजाराम यादव
शिराळा.

marathi love poem shayari in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *