Marathi Love Story

पहिल्या प्रेमाची गोष्ट | Best Marathi Love Story 2023

जस प्रत्येकाच्या जीवनात पहिले प्रेम महत्वाचे असते तसे माझेही आहे. एवढाच फरक कि माझं कुणा मुलावर प्रेम नव्हत. मग काय होत ते वाचा माझ्या Marathi Love Story मध्ये.

पहिले प्रेम | Marathi Love Story

खूप दिवसांनी आठवणींची पाने चाळत होते अन् चाळता चाळता तुझा सुगंध सभोवार दरवळू लागला…प्रत्यक्षात तुझीचं अनुभूती मला आली ..अन् मोहवेडी होऊन मी भुरळून गेले , एकएक मोरपीस हळूच गालावर फिरवू लागले..

रोज मी सायकलवरून क्लास साठी जायची ,सोबत मैत्रिणी ही असायच्या त्यांच्याशी बोलता बोलता तुझा कानोसा मी घ्यायची, दूर जरी असले तरी तुझा सुगंध माझ्या चौफेर फिरायचा, मोहित केल्याप्रमाणे मी तरळत राहायची ..तुझ्या जवळून जातांना मान आपसूक वळायची ,

पहिले प्रेम

दीर्घ श्वास घेतला की तुझी छबी अंतरात हृदयात उतरायची , ती धवल कांती , ते मोहक व आकर्षक रूप वेड लावायचं ..असं माझचं होत होते असे नाही..पण माझ्या सख्यांची सुद्धा हीच अवस्था असायची तुला बघुन . खूप हेवा वाटायचा तुला बघुन इतकं सुंदर रूप , सुगंधित करणारा गुण अन् जिथे जाशील तिथे आपली छाप उमटवणारे व्यक्तिमत्व …किती सुरेख असायचं रे हे सर्वचं,

पहिल्या प्रेमाची गोष्ट | Best Marathi Love Story 2023

…कधी कधी हसत मुख असतांना पाहिलं तसेच कधी कधी एकटा नाराज कोमेजून गेलेला ही पाहिलंय तुला, पण तुझ्या सहवासाचा गंध हा कायम तसाचं राहिला..हे तुझ्यावरील असणारं निस्सीम प्रेम असेल कदाचित ……
हे असे नियमित आणि छान सुरू होते हे तूही जाणले असशील
…पण काळाबरोबर वेळ ही सरत होती,
आणि तसचं व्हायचं,

पहिल्या प्रेमाची गोष्ट

.. ..माझा क्लास आता संपणार याची जाणीव व्हायची अन् मन निराश
व्हायचं, …काही सुचेना असे व्हायचं , तुझ्या जवळ येवून तुला घट्ट मिठी मारावीशी वाटायची , तुझ्या सुगंधी प्रेमाचा वर्षाव व्हावा अस खूप वाटायचं पण …ते धाडस कधी मी केलेच नाही कारण तुझ्या घरातील कोणीतरी येतील व पाहतील याची भीती वाटायची ….

पहिल्या प्रेमाची गोष्ट | Best Marathi Love Story 2023


काव्य संध्या यांचा इतर लेख वाचा :- मुकी होत चाललेली घरे | Best Marathi Essay On Ghar 2023

वाचा युनिक वाढदिवसाच्या शायरी Marathi Birthday Wishes

वाचा आयुष्यावर प्रेरनादायी विचार Read Quotes on life


जाता येता वळून पाहण्या शिवाय मी काहीच करू शकत नव्हते …पण माझ्या मैत्रिणीने ते अचूक हेरले होते . ती ही तुझ्या विषयी बोलायची , तुझे गुणगान तर इतकं व्हायचं की बोलता बोलता क्लास मध्ये कधी पोहचत असू ते सुद्धा कळायचं नाही .
आणि ती सुद्धा
तितकीच गुंतली होती तुझ्यात ..मग आम्ही सहमतीने तुलाच अगवा करायचं असं ठरवलं

..अन् येता येता तुला आम्ही अलगद उचलून आणल्या सारखचं आणले..पण ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न …मग अशीच एक जागा शोधून तुला सुखरूप ठेवल्याचं आठवते …
शाळेतून आल्यावर तुला पाहिलं तर एकदम निस्तेज चेहरा झाला होता तुझा ….मला काही सुचेना लगबगीनं तुला राहण्यासाठी मस्त जागा सापडली व तिथे तुला सुरक्षित केलं,
…थोडे पाणी प्यायला दिलं आणि मी घरात निघून गेले …

पहिल्या प्रेमाची गोष्ट | Best Marathi Love Story 2023

सकाळी उठले तरी तुझा चेहरा अजून काही ठीक वाटला नाही …. मग आणखी काही खायला प्यायला देता येत का बघुन मी ते आणले व तुला दिले …. या नंतर तुझ्यासोबत दिवसभर राहणे मला शक्य नव्हते ..म्हणून तुला सोडून मला जावेच लागले…. सायंकाळी घरी आले …पाहिलं तर तुझ्या गाली थोडी लाली आली होती…
असे रोजचं थोडं थोडं तू फुलत होतास अन् मी तुझ्या सेवेत नित्य होते ….मनमोकळे बोलणे, तुझा सहवास आता रोजचाच झाला होता … तू काही महिन्यातच इतका बदलास की तुझं अंग ,रूप ,रंग खुलून आले अन् माझ्या दारावरून जाणारे ही आता तुला पाहू येता जाता पाहू लागले,

… मी ही त्यांच्यावर नजर रोखून असायची पण त्यांची ही अवस्था माझ्यासारखीच असणार ना..कारण तुझा मोहच असा आहे की तो कोणीचं टाळू शकत नाही ….
पण ..एक दिवस असा आला …की मला तुला सोडून जावे लागले
..त्याला माझ्याकडे पर्याय नव्हता ना रे!
..तुझा गंध मला पायात बेड्या घातल्या सारख्या अडवत होता, पण नाईलाज होता रे माझा तुला सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागलं,मी काय करणार ते पण मला महत्वाचं होतं ना रे,

पण एक खरं सांगू का तुला,
तुझं माझ्या अंगणी असणचं माझ्यासाठी खूप होतं ..तुझ्यावर केलेले नितांत प्रेम अजून ही तितकेच प्रेमळ व सुगंधी आहे …
तुझ्या असल्याने ती पहिली मधुचंद्राची रात्र आठवते मला आजही,
केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा तुझे अस्तित्व आणखीनच प्रगल्भीत करतो….

आज माझ्या अंगणात आणि सभोवताली अगणित दरवळणारी फुलं आहेत पण तुझी सर बाकी मला कोणत्याच फुलातं जाणवली नाही ….
हे माझे मोगरा प्रेम पहिलं अन् शेवट होते….कारण त्या मोगऱ्या प्रमाणे नंतर कोणतेच फुल इतकं आकर्षक वाटले नाही……

पहिल्या प्रेमाची गोष्ट | Best Marathi Love Story 2023

तुझी प्रेयसी
काव्य संध्या

sandhya

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *