Marathi Story On Love

Marathi Story on Love :पहिलं प्रेम भाग १

Love Story in Marathi : पहिलं प्रेम भाग १

सकाळची वेळ, गार वारा आणि सूर्याची कोवळी किरणे. देवाचं दर्शन घेतलं, आई बाबांचा आशीर्वाद घेऊन मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू ला निघालो. तिथे पोहचायला तीस मिनिटे लागणार होती पण मी तासभर आधीच निघालो. बस ची वाट पाहत थांबलो होतो आणि तेवढ्यात तिथे एक मुलगी पळत आली, आणि थांबताच मला एका ठिकाणी जायचय तर तिथे जायला बस मिळेल का असं विचारलं. तेवढ्यात मी देखील बोललो हो, इथेच भेटेल मी देखील तिकडेच चाललोय. आता तिच्या पोशाखावरून मला वाटलं की ही कुठेतरी कामाला असेल तिकडे, पण नंतर वाटलं असं असतं तर बस ची चौकशी केली नसती. असो, असेल ते असेल मला काय. पण खरच का, “तुला काय?” असं. तेवढ्यात बस आली आणि आम्ही दोघे बस मध्ये बसलो. आम्ही एकमेकांच्या शेजारी नसलो तरी आमचे बाकडे शेजारीच होते, आणि मी अजून त्याच कोड्यात की ही तिथे का चालली असेल. पण काय गरज एवढा विचार करण्याची, कोण होती ती? शेवटी न राहून मी तिला विचारले, “इथे नवीन आहेस वाटतं?””हो, खरं तर ह्या शहरातच नवीन आहे.””अच्छा, मग इथे कुठे नातेवाईक आहेत का?””नाही नाही, तसं कोणी नाही जवळचं, मी इथे एका इंटरव्ह्यू साठी आलीये.””हो का, आणि कुठे आहे इंटरव्ह्यू?”तिने जो पत्ता सांगितला, तिथे तर मीही जाणार होतो. पण मी मुद्दाम तिला तसं काही बोललो नाही. कसं असतं, अनोळखी व्यक्तीशी ओळख करण्यासाठी थोड्या अशा गमतीदार गोष्टी कारणीभूत ठरतात.

Love Story in Marathi : पहिलं प्रेम भाग १

तेवढ्यात तिने देखील तोच प्रश्न विचारला,”अगं, माझं इथे मित्राकडे जरा काम होतं तिथे चाललोय.””मला हा पत्ता जरा नीट सांगतोस का? करण तिथे उतरल्यावर कुठे जायचं ते सुद्धा मला माहित नाहीये.”मग मी तिला संपुर्ण पत्ता समजून सांगितला आणि बस आमच्या स्टॉप ला येऊन थांबली.तिने उतरल्यावर मला धन्यवाद बोलून मी सांगितलेल्या मार्गावर चालती झाली.मला देखील तिकडेच जायचं होतं पण मी आता जरा वेळाने जाईल म्हणतो. आणि थोडा वेळ तिथे घुटमळत मी त्याच दिशेने रवाना झालो. तिथे पोहचताच गेट वरील वहीमधे माझं नाव लिहिलं, आणि अगदी तीन ओळींच्या आधी एक मुलीचं नाव होतं, आणि मी तर्क लावला की हे तीचंच नाव असावं. तिथे गेलो तर वीस ते पंचवीस लोक आधीच आलेले होते. बेरोजगरीच हो ती, त्या मानाने आकडा कमी वाटला.Maza Blog

मी आत पाऊल ठेवणारच तेव्हा तीच माझ्या दिशेने मला येताना दिसली, आणि चोर पकडला गेला. “अरे, तू इथे कसा?””मी सुद्धा इथे इंटरव्ह्यू साठी आलोय.” खाली मान घालत मी उत्तरलो.”पण तू तेव्हा तर मित्राकडे जायचं बोलला होता.””हो पण ते अ ब……” तिच्याशी गम्मत करायला निघालेली मी, तिने विचारताच वाचा हरवून बसलो.”अवघड आहेस अगदी.” ती हसत हसत बोलली.तिच्या हसण्यात मला एक मोकळेपणा आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा पत्ता, दोन्ही गोष्टी मिळाल्या. “काय रे, नाव काय तुझं? मी ****.”माहितीये मी असं पुटपुटलो.”हा, काय म्हणालास?””काही नाही काही नाही, मस्त नाव आहे, माझं नाव *****”ओळख झाली आणि मग दिवसभर तिथल्या वातावरणात आम्ही रमलो, कॉलेज ला कुठे होते? गाव कोणतं? इ. गोष्टींची चर्चा झाली. आणि संध्याकाळी आम्ही एकत्र तिथून बाहेर पडलो…..

Love Story in Marathi : पहिलं प्रेम भाग १

तो माझा पहिला असा इंटरव्ह्यू होता की जिथे मला त्याच दिवशी निकाल जाहीर झालेली भावना आली. यापूर्वी पूर्ण शिक्षण घेत असताना एकही मुलगी बोलली नव्हती. म्हणजे अवघड पेपर असला तरीही शेजारच्या पोरीने उत्तर देखील विचारलं नाही. आणि आज जवळपास पूर्ण दिवस मी अगदी छान ओळख असल्यासारखा बोलत होतो. आणि मला तो एक लोकरचा गोळा आणि दोन सुया भेटल्या होत्या. आणि दिवसभराच्या बोलण्यातून असं कळलं की मला वाकड्यातीकड्या का होईना पण गाठी मारता येत होत्या. आणि मी माझ्या उबदार पांघरुणाला विणायला सुरुवात केली खरी. दिवसभराची ओळख ही एकमेकांना मोबाईल नंबर देईपर्यंत वाढली होती. त्या रात्री “गुड नाईट!” आणि “स्वीट ड्रीमस्!” असा जगमान्य मेसेज मी तिला पाठवला. आणि त्यावर तिनेही मला “gn sd” असे चार हे सुद्धा जगमान्य अक्षरं पाठवली. तिने मला काय मेसेज केला यापेक्षा तिने मला मेसेज केला याची गुदगुली मला झाली होती. आणि मी त्या स्मितहास्यात झोपी गेलो.Love Story in Marathi : पहिलं प्रेम भाग १

Author – स्वप्नील खैरनार

Marathi Love Story

Love Story in Marathi : पहिलं प्रेम भाग १

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

18 thoughts on “Marathi Story on Love :पहिलं प्रेम भाग १”

  1. या ना त्या कारणाने आपल्याला आपलं पाहिलं प्रेम सतत आठवत राहतं हे खरं आहे.
    छान लिहिलं आहे.
    मी सुद्धा माझ्या वेबसाईटवर लिखाण करत असतो खाली लिंक डेत आहे.https://lekhanisangram.com/marriage-materialhttps://lekhanisangram.com/marriage-material/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 + 11 =