Marathi Maitri Var Kavita

मैत्री आमची जगावेगळी By चि. नागेश अनिलराव नाईक | Best Marathi Maitri Var Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी चिनागेश अनिलराव नाईक यांची -विषय – मैत्री आमची जगावेगळी – हि कविता -Marathi Maitri Var Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्री आमची जगावेगळी By चि. नागेश अनिलराव नाईक | Best Marathi Maitri Var Kavita 2023

मैत्री आमची जगावेगळी | Marathi Maitri Var Kavita

Best Marathi Maitri Var Kavita 2023

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
असच म्हणतो आपण
पण त्या आठवणीच जीवनाला ऊर्जा देत असतात
साथ जरी संपली तरी शाळेतील मित्र कधीच संपत नसतात


जिवलग जरी असले तरी पण भांडण चांगलीच असायची
अगदी छोट्या कारणावर सगळी मंडळी रुसायची


शाळेतील मित्रांच प्रेम अस काही असत
आयुष्यभर हृदयाच्या कोपऱ्यात घट्ट बसत


सुखात त्यांची साथ होते दुःखात त्यांचा हात होता
माझ्या अमूल्य बालपणात त्यांचं मोठा वाटा होता


भविष्याची चिंता नव्हती अन् कसल भान काही
चिंता फक्त दोघांची क्रिकेट आणि माही


उगवणाऱ्या सूर्यापेक्षा मावळणारा सूर्य आम्हा जास्त आवडायचा
सूर्य जरी बुडला तरी आमचा कट्टा गच्च भरलेला असायचा


शाळेत प्रत्येकाला बापाच नाव द्यायची जणू काही प्रथाच होती
तरीपण आमची यारी म्हणजे एखाद्या सिनेमाची कथाच होती


भांडण तर असले आख्या शाळेची नजर आमच्यावर असायची
पण रात्री सगळ मिटवून मित्रमंडळी कट्ट्यावर बसायची


एक वेगळंच नात होत झाडा फुलां सोबत आमचं
अन् मैदानं म्हणजे दुसर घरचं होत आमचं


घरी असुंनही जीव आमचा शाळेत अडकलेला असायचा
मग काय परीक्षेत फेल अन् बाप भडकलेला असायचा


थोड्याशा रुपयातच आयुष्य जगावं लागायच
तरीही मित्रांमध्ये जगावेगळं सुख पाहायला मिळायच


शाळेत तर ठीक पण गल्लीत पण आमची होती हवा
सगळ्यांचं फिक्का पडेल असा होता आमचा मितवा


आता दिवस रात्र कळत नाहीं कामाचे ओझे आहेत फार
आता फोन, संगणक, ओफिस, गाडी, हेच आहेत माझे यार


आता कुणी गाठलय बैंगलोर तर कुणी ऑस्ट्रेलिया
कुनी असत फोन वर तर कुणाची फक्त छाया


तुमच्या शिवाय जगण्याला काहीच उरला नाहीं अर्थ
बालपण व्यवस्थित पण तारुण्य चाललय व्यर्थ


आकाशातल्या ढगांना बहरलेल्या पानांना बोलतो
वाहणाऱ्या पाण्याला देखील मी तुमचा पत्ता विचारतो

विसरतय खूप बालपणाच्या आठवणीतलं
पण विसरत नाहीत मित्रांमधले किस्से
संकटात दिलेला हात अन् दुःखा मध्ये मागितलेले हिस्से

विषय - मैत्री आमची जगावेगळी  By चिनागेश अनिलराव नाईक| Best Marathi Maitri Var Kavita 2023

मैत्री आमची जगावेगळी By चि. नागेश अनिलराव नाईक | Best Marathi Maitri Var Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मैत्री आमची जगावेगळी By चि. नागेश अनिलराव नाईक | Best Marathi Maitri Var Kavita 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 × 4 =