Marathi Motivational Kavita Inspirational Poem | 5 मिनिटांची प्रेरणादायी कविता मराठी तुमचे जीवन बदलेल
दगडालाही पाझर फुटावे, एवढे वारे तू झेलला असशील
पाठीवरती संघर्षाच्या काठीने, कितीही मार तू पेलला असशील
तरी खचून मित्रा जाऊ नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
काटेरी तुझ्या वाटांवरती, चालतांना काटेही रुतले असतील
रुतून रुतून काटे मित्रा, तुझे पाय ही रक्ताळले असतील
तरी थकून मित्रा जाऊ नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
वळणा – वळणांवरती तुझ्या, कित्येक मोड येतील
आपलीच माणसे असून तरी, कित्येकदा आड येतील
तरी चालायचं मित्रा सोडू नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
Marathi Motivational Kavita Inspirational Poem | 5 मिनिटांची प्रेरणादायी कविता तुमचे जीवन बदलेल
चालता चालता तू, कितीतरी वेळा पडशील
ठोकरा लागल्या वाटेत तर तू, अनेक वेळा अडशिल
तरी कधीच मित्रा तू थांबू नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
वाटेतील ठोकरांमुळे तुला, असह्य अशा वेदना होतील
अश्रू हि तुझ्या डोळ्यांमधूनी, आता आपसुकच यायला लागतील
पण कधीच मित्रा तू रडु नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
एकदा अपयश मिळेल तुला, यशाची हुलकावणी मिळेल
प्रसंगी तुला हजारदा, अपयशाशी सामोरं जावं लागेल
पण नशिबाला दोष मित्रा देऊ नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
Marathi Motivational Kavita Inspirational Poem | 5 मिनिटांची प्रेरणादायी कविता मराठी तुमचे जीवन बदलेल

यश म्हणजे काही भाजीपाला नाही, जो सहज तुझ्या पदरी पडेल
अनेक यातना भोगशील मित्रा, प्रसंगी मृत्युला पण झुंज द्यावी लागेल
पण हरायचा विचार मित्रा करू नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
यशाच्या शिखरावर जाशील तू, पण त्याला खूप वेळ द्यावं लागेल
आणि वेळच आली तर, तुला अख्खं आयुष्य ही खर्ची घालावं लागेल
पण धीर मित्रा सोडू नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको
Marathi Motivational Kavita Inspirational Poem | 5 मिनिटांची प्रेरणादायी कविता तुमचे जीवन बदलेल
जागोजागी मिळतील वैरी, त्यांना तू घाबरून जाऊ नको
मन चंचल असलं जरी, तू ध्येयाचा विसर पडू देऊ नको
जन्माला आलाच आहेस तर, काहीतरी असामान्य करून दाखव
सामान्य होऊन मरू नको, आयुष्य एकदाच मिळते
त्याला व्यर्थ तू जाऊ देऊ नको, तू जिंकशील आणि नक्कीच जिंकशील
फक्त प्रयत्न करायचं मित्रा तू सोडू नको, प्रयत्न करायचं तू सोडू नको….
Marathi Motivational Kavita Inspirational Poem | 5 मिनिटांची प्रेरणादायी कविता तुमचे जीवन बदलेल
कवी आशु छाया प्रमोद (रावण)

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi
Pingback: QUOTES ON LIFE IN MARATHI | जीवनाला दिशा देणारे 100 सुविचार
Pingback: कर्ण मरण्यापूर्वी कृष्णास 10 प्रश्न| Karna Story in Marathi