Marathi Patra Lekhan Best Format मराठी पत्र लेखन

Marathi Patra Lekhan Best Format मराठी पत्र लेखन

पत्र लेखन म्हणजे

एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला आपल्या भावना कागदावर लिहून व्यक्त करते. याच प्रक्रियेला पत्र लेखन असे म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या भावना दुस-यासमोर व्यक्त करते.
त्यानंतर पत्र घेणारी व्यक्ती त्या पत्राचे उत्तर त्या व्यक्तीला पत्राद्वारे पाठवते. पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी संदेश पाठवण्याचे एकमेव साधन म्हणजे पत्र होते. Marathi Patra Lekhan in marathi Format मराठी पत्र लेखन

पत्रलेखनाचे प्रकार दोन आहेत .औपचारिक पत्रे आणि अनौपचारिक पत्रे

अ)औपचारिक पत्रे

आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला काही शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते.
आपली कामे पूर्ण व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांनाच ‘औपचारिक पत्रे’ असे म्हणतात.हेच पत्र कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त लिहावे लागते. हे देखील ‘औपचारिक पत्र’च होय. आपली कामे आपण कोणालाही त्रास न होता,बिनचूक आणि त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्याची एक ठरलेली रूपरेषा असते. त्यामध्ये शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात.या पत्रांमध्ये फापटपसारा नसतो. कामाचे स्वरूप हे थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट करावे लागते. मित्रांना किंवा नातेवाइकांना लिहिलेल्या पत्रामध्ये जशी सलगी व्यक्त होते,तशी सलगी या औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्राची खास वैशिष्ट्ये आहेत.

औपचारिक पत्रांचे पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात

मागणीपत्र
विनंतीपत्र
निमंत्रणपत्र
आभारपत्र
अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र
चौकशीपत्र
क्षमापत्र
तक्रारपत्र
स्व-परिचयपत्र

औपचारिक पत्र कसे लिहावे

पत्राच्या सुरुवातीला वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा. प्रति यांचे नाव दिलेले असेल , तेच लिहावे. तसेच त्यांचा हुद्दाही लिहावा. याची सुरुवात डावीकडे करावी.प्रति यांचा पत्ता प्रश्नपत्रिकेत दिला असेल तर तोच लिहावा. पत्ता दिलेला नसेल, तर तो काल्पनिक असा लिहावा.प्रति यांचा पत्ता लिहिल्यावर पत्राचा विषय लिहावा.विषयानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे ‘महोदय’ किंवा ’महोदया’ हे संबोधन लिहावे . आणि स्वल्पविराम दयावा. (‘मा. महोदय/महोदया’ किंवा ‘माननीय महोदय/महोदया’ असे न लिहिता फक्त ‘महोदय’/’महोदया’ एवढेच लिहावे.)
त्यानंतरच्या ओळीमध्ये मजकुराला सुरुवात करावी. यातील प्रत्येक परिच्छेदाची सुरुवात हि डावीकडे करावी. ‘आपला विश्वासू’,किंवा ‘आपला कृपाभिलाषी’ या किंवा यांसारख्या शब्दांनी शेवट करून त्याखाली जर प्रश्नात प्रेषकाचे नाव आणि पत्ता दिलेला असल्यास तो लिहावा. प्रेषकाचे नाव दिलेले नसेल तर काल्पनिक नाव लिहून, काल्पनिक पत्ता लिहावा. हे तपशील पण डावीकडे लिहावेत. पत्त्यानंतर स्वत:चा e-mail id पण लिहावा. Marathi Patra Lekhan in marathi Format मराठी पत्र लेखन

१) स्व-परिचयपत्र

एखादया पदाच्या नेमणुकीसाठी अर्ज करणे किंवा एखादया स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज करणे हा पत्रलेखनाचा पण एक प्रकार आहे.अशा प्रकारच्या पत्रामध्ये मुख्य पत्राबरोबरच स्वत:ची माहितीही जोडावी लागते. अशी स्वत:ची माहिती असलेल्या पत्राला स्व-परिचयपत्र म्हणतात.स्व-परिचयपत्रामध्ये आपण त्या पदासाठी किंवा स्पर्धेसाठी योग्य असा एक उमेदवार आहोत,अशा स्वरूपाची माहिती आपण दिलेली असते. Marathi Patra Lekhan in marathi Format मराठी पत्र लेखन

२) मागणीपत्र

वस्तूची ,सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र.मागणी पुरवणाऱ्याला योग्य असा मोबदला देण्याची आपली तयारी असते.पैशाच्या बदल्यात वस्तू आणि सेवा देण्याघेण्याचा केवळ व्यवहार. त्यामध्ये भावनेचा अंश कमी असतो.सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत म्हणून यामध्ये विनंतीची भाषा असते . मात्र पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते.

Marathi Patra Lekhan Best Format मराठी पत्र लेखन


मागणीपत्राच्या विषयाची कक्षा खालीलप्रमाणे

शालेय वस्तूंची मागणी . (तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, वह्या , पुस्तके, स्टेशनरी, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.) .
घरगुती उपयोगातील आवश्यक वस्तूंची मागणी करणे.
कॅटर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे.
वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे.
शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदणे.
माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था इ . ).
आपत्तिग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मागणी. Marathi Patra Lekhan in marathi Format मराठी पत्र लेखन

3) तक्रारपत्र

कशाबद्दल तरी किंवा कोणाविरुद्ध तरी तक्रार केलेली असते. तक्रारीची कारणे ही फसवणूक, नुकसान, अन्याय इत्यादी असू शकतात . त्या संबंधित व्यक्ती, संस्था किंवा शासन यांच्याकडे तक्रार केली जाते .अश्या तक्रारपत्रात तक्रार निवारणाची विनंती केलेली असते. तरीही हे विनंतिपत्र होत नाही . पत्राच्या गाभ्यामध्ये हे तक्रार पत्रच असते.

तक्रारपत्राच्या विषयाची कक्षा

फसवणूक होणे , नुकसान होणे , अन्याय होणे ,हक्क हिरावून घेतला जाणे, समाजधारणेला घातक बाबी असणे, तसेच मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या बाबी (उदा., वृक्षतोड) इ . प्रकारांविरुद्ध तक्रार नोंदवणे.

ब ) अनौपचारिक पत्र

आई, वडील, बहीण , भाऊ वा इतर कोणी आप्तेष्ट आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, म्हणजे ‘अनौपचारिक पत्रे’ होय . हल्ली संदेशवहनातील झालेल्या प्रचंड क्रांतीमुळे अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टातच आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हा हल्ली फारच कमी प्रमाणात झाला आहे .मोबाइल , इंटरनेट, संगणक, यांमुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हा मंदावला आहे. हे खरे असले, तरी त्यांच्यामुळे पत्रव्यवहार हा चालूसुद्धा राहिला आहे. काही वेळा माणसे आपल्या कामात असतात.कधी कधी संपर्क होऊ शकत नाही. अशा वेळेस ई-मेलद्वारे पत्रे पाठवली जातात. तसेच तंत्रज्ञानाचा प्रभाव व सुलभता यांमुळे ई-मेलचा प्रसार खूपच वाढला आहे.या वर्षापासून इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात अनौपचारिक पत्रांपैकी कौटुंबिक स्वरूपाच्या पत्रांचा समावेश केलेला आहे. Marathi Patra Lekhan in marathi Format मराठी पत्र लेखन

अनौपचारिक पत्र लिहिताना घ्यावयाची दक्षता

पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये तारीख लिहावी.पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नसते .पत्र आपण कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा. आईवडिलांना किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना ‘शिरसाष्टांग नमस्कार किंवा ‘शि. सा. नमस्कार’ . कुटुंबातील इतरांना ‘सा. न./साष्टांग नमस्कार/नमस्कार/आशीर्वाद’ यांपैकी जो योग्य शब्द आहे तो लिहावा .पत्रातील मजकूर लिहिताना योग्य त्या ठिकाणी परिच्छेद पाडावेत.पत्राची भाषा ही सहज बोलल्यासारखी आणि घरगुती असावी.पत्राचा समारोप म्हणजेच शेवट योग्य प्रकारे करावा.

पूर्वी च्या वेळी आईवडिलांना पत्र लिहिताना मायन्यात ‘तीर्थरूप’, लिहिण्याची पद्धत रूढ होती. तसेच, वडीलधाऱ्या नातेवाईकांना ‘तीर्थस्वरूप’ आणि आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना ‘चिरंजीव’ लिहिण्याची पद्धत होती. मात्र अलीकडेच ‘तीर्थरूप’, ‘तीर्थस्वरूप’ व ‘चिरंजीव’ या शब्दांऐवजी ‘प्रिय’ हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ‘प्रिय दादा’, ‘प्रिय ताई’, ‘प्रिय आजोबा’, ‘प्रिय आजी’, ‘प्रिय काका/काकी’, ‘प्रिय मामा/मामी’ वगैरे असे शब्द मायन्यात योजले जातात.‘प्रिय’ या शब्दातून आपल्याशी अधिक जवळीक साधलेली दिसून येते. तसेच अभिवादनदर्शक मजकुरात आपल्या आईवडिलांना “शि. सा. नमस्कार’ व अन्य ज्येष्ठ (मोठ्या )नातेवाइकांना ‘साष्टांग नमस्कार’ हे शब्द लिहिले जातात. तर आपल्या पेक्षा लहानांना ‘अनेक आशीर्वाद’ असेही शब्द लिहिले जातात. Marathi Patra Lekhan in marathi Format मराठी पत्र लेखन

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *