देश गौरव जय जवान | best Marathi Poem for Army in 2024

श्री. पद्माकर दत्तात्रेय वाघरुळकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Poem for Army in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi Poem for Army in 2024

स्पर्धेसाठी-
काव्यबंध समूह (आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार) आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य ‘स्पर्धेसाठी’
दि.२५ फेब्रुवारी २०२४ रविवार
विषय- सैनिकासाठी कविता

देश गौरव जय जवान | Marathi Poem for Army in 2024

नारा लाल बहादूर शास्त्री
दिला जो देशवासियांसाठी
राहू तनमनधनाने सदा
शेतकरी व सैनिकांपाठी

देशवासिय जो देशातला
तेव्हाच झोपतोय सुखाने
रात्रंदिन तो खडापहारा
सैनिक करी स्वसामर्थ्याने

भूदलातील जे भूसैनिक
नौदलातील नौसैनिकही
आकाशीचे जे वायूसैनिक
तत्पर जे सदा प्राण देण्यासही

सीमा सुरक्षा दलातीलही
सैनिक तटरक्षक सदा
डोळ्यात तेल घालुनिया जे
दूर करी देशाच्या आपदा

मोठ्या आनंदाने जेव्हा तोच
देशभक्तीनेच भारलेला
इंच इंच भूमीसाठी लढे
भारतीयांचा जो असलेला

पत्र जेव्हा हजर होण्याचे
सर्व सैनिकां हाती पडते
करण्या शत्रूचा मुकाबला
नसांचे रक्तही खवळते

पत्नी आई औक्षणासह
देशबांधवांच्या भावनांनी
येई अंगी बळ हत्तींचेच
सदा शत्रूला पाजण्या पाणी

पत्नी आईच्या डोळ्यातील जे
मनी नेहमी भाव जपतो
मातृभूमीच्या रक्षणास जो
सर्वस्व पणालाच लावतो

बंदुका रोखतो शत्रूंवर
तोफगोळ्यांनी मारा करतो
जखमी सहकार्या मदत
लाडका सर्वांचाच ठरतो

मान राखण्या राष्ट्रध्वजाचा
सदैव कापतो शत्रू मान
अतुलनीय पराक्रमाने
देश गौरव जय जवान

जेव्हा तिरंगी झेंड्यातले
लपेटलेले ते कलेवर
भारत माता की जय शब्द
उच्चारती सर्व नारी नर १०

ठेवू मनी सदैव भावना
सैनिक व त्याचा परिवार
सैनिक कल्याण निधीलाही
लावू नेहमीच हातभार ११

✍️शीघ्रकवी श्री पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर 📱९७३०७९८२७९🤝

Marathi Poem for Army in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *