Marathi Poem For Boyfriend

Marathi Poem For Boyfriend | बॉयफ्रेंड साठी प्रेमाची कविता

Marathi Poem love Kavita For Boyfriend | बॉयफ्रेंड साठी प्रेमाची कविता

अवचित पडलेल्या तुझ्या पावलांनी सख्या, आयुष्य माझं सोनेरी किरणांनी बहरलं

जणू भर उन्हात ही धो धो पाऊस पडला, अन ओसाडलेल्या जमिनीवर हिरव रोपट उगवलं…..

तुझ्या येण्याने रे माझ्या आयुष्यात सारं काही बदलून गेलं….

घेता मिठीत मजला रे क्षणभर तू , दुःख सारं हरवून गेलं…

तु असलास जवळी माझ्या की जणू, अख्खं जग माझ्या जवळ असल्यागत वाटते
स्वप्नात का होईना रे माझ्या सख्या, मला वास्तवात जीवन जगल्यासारख वाटते

तुझ्या हसण्याने मनात माझ्या, काहीसं विचित्र वाटतंय
जणू मोर ही आपला पिसारा फुलवून, नाचायला लागलंय असं वाटतयं
तुझे हे हसणे कायम असच राहू दे….

Marathi Poem love Kavita For Boyfriend | बॉयफ्रेंड साठी प्रेमाची कविता

Marathi Poem love Kavita For Boyfriend | बॉयफ्रेंड साठी प्रेमाची कविता

जपून ठेवायला मी ही माझे प्राण अर्पण करेन
पण तू ही तुझे आनंद असच द्विगुणित करून
वाऱ्या संगे वाहू दे……..

तुझ्यावर येणाऱ्या संकटांना आधी मी सामोरे जाईन
आणि तुझ्या हसण्याला मी साबुत ठेवीन

तुझ्या हसण्याने मला माझ्या नाही, तुझ्या वर येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी बळ येते….
डोळ्यांमधूनी येणाऱ्या अश्रूंना पुसण्यासाठी, जणू पावसाची एक झळ येते….

Marathi Poem love Kavita For Boyfriend | बॉयफ्रेंड साठी प्रेमाची कविता

हातात हात घालून फिरतोस तु, अन् मजला स्पर्श करतोस तू
तुझ्या त्या स्पर्शामधला तो भाव, माझ्या काळजाला जणू घालतो घाव
जसं पॉझ बटन दाबून व्हिडिओ थांबतो, तसच तो क्षण ही मजला थांबवून ठेवावा वाटतो

आता तू म्हणशील मला, एवढं प्रेम का करतेस गं माझ्यावर

अरे वेड्या मी तुझ्या प्रेमामुळेच तर जगत आहे, आणि मी तुझ्यावर नाही तर मी प्रेम करते माझ्या जगण्यावर

आणि माझं जगणं हे फक्त तू आहेस, म्हणून माझं प्रेम तु आहे

तू आहेस म्हणून मी जिवंत आहे, तुझ्याविना रे सख्या माझं जीवन नाशवंत आहे…

Marathi Poem love Kavita For Boyfriend | बॉयफ्रेंड साठी प्रेमाची कविता

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *