marathi poem for inspiration in life

आयुष्याच्या सायंकाळी आणि आयुष्य एक कर्म | 2 Best marathi poem for inspiration in life

अर्चना कुलकर्णी आणि गोविंद कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem for inspiration in life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi poem for inspiration in life

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा
रविवार दिनांक ०१/१०/२०२३

आयुष्याच्या सायंकाळी | marathi poem for inspiration in life

आयुष्याच्या सायंकाळी आणि आयुष्य एक कर्म | 2 Best marathi poem for inspiration in life

आयुष्याच्या सायंकाळी,
मागे वळून पाहताना
दूरवरून येणारी वाट,
वळणांवरून धावताना
खाच खळग्यातून, फुलातून,
काट्यातून पुढे सरकते
अनुभवांची शिदोरी ,
आता ओसंडताना दिसते

आयुष्याच्या सायंकाळी,
मागे वळून पाहताना
अनेक चेहरे, अनेक नजरा,
कित्येक भाव जाणताना
राग नी तिरस्काराचे आगीचा
मन जेव्हा होरपळते,
स्वजनांच्या स्नेहाचे कारंजे तेव्हा
मनमोराला भिजवते…..२

आयुष्याच्या सायंकाळी,
मागे वळून पाहताना
कष्टाचे उपसे,पराभवाचे शल्य,
दिसतात मन:चक्षूंना ,
तिथे यशाचा मोहोर सुंदर
समाधानाची देखणी फुले
आठवांच्या हिंदोळ्यावर
फुले मन हळूवार झुले…३

आयुष्याच्या सायंकाळी,
मागे वळून पाहताना
पाखरु दिसे आकाशी ,
उंच भरारी घेताना
चिमुकली त्याची सावली,
बाल्य फिरूनी आले दारी
शिशिरात जणू वसंताचा ,
बहर होऊनीया हो घरी..४

अर्चना कुलकर्णी
ठाणे

marathi poem for inspiration in life

काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक. १/१०/२०२३
विषय : आयुष्य

आयुष्य एक कर्म | marathi poem for inspiration in life

आयुष्य एक कर्म | 2 Best marathi poem for inspiration in life

आयुष्य एक पुस्तक असत
रोजच पान उलटल जात
कर्म त्यात लिहिलेलं असतं
नियतीला मानायला लागत…१

आयुष्य रोज गणित घालत
आकड्यांचा सारा खेळ असतो
आकडेमोड नुसती असते
कृप्ती त्यात दडलेली भासते….२

आयुष्य एक नाणं जोपासत
एका बाजूला सुख दिसतं
दुसऱ्या बाजूला दुःख लपत
पाठीशी सतत उभ असत…..३

प्रेमांकुराचं आयुष्य मिळत
नात्यानी प्रेम जिंकावं लागत
प्रेमानी पोट भरत नसत
प्रेमात सूख शोधत असत….४

कर्तव्यावर आयुष्य चालतं
कर्तुत्वावर जीवन धावत
यश शिखरावर चढवत
आयुष्य खूप गौरवल जात…५

आयुष्याची धनसंपदा खेळे
आरोग्याची समृद्धी लाभतात
आयुष्याला कलाटणी देणारी
दुःखाची किमया पालटतात..६

अहंकार कर्माला भुलवीतो
मत्सर कर्मांला सुड दावते
नियती दोघांना लांब ठेवते
आयुष्याच्या कर्माला सुखावते..७

दीर्घायुषी आयुष्यातील पान
कधीही उघडताना भासते
नियती आयुष्याला हसताना
कर्मावर नेहेमी डाफरते….८

(C)(R)
गोविंद कुलकर्णी
नौपाडा ठाणे

Best marathi poem for inspiration in life

marathi poem for inspiration in life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *