ऋणात तुझ्या | Best Marathi Poem for Jawan in 2024

डॉ. दक्षा पंडित यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Poem for Jawan in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi Poem for Jawan in 2024

काव्यबंध समूह
रविवारीय काव्यलतिका स्पर्धा
दि:२५.२.२०२४
विषय : सैनिकासाठी कविता

ऋणात तुझ्या | Marathi Poem for Jawan in 2024

तमा जीवाची नसे त्याला
बिकट काळात झुंझितो
खडतर जीवन जगुनी
देशास आपल्या रक्षितो…१

दुर्गम निसर्गावर सदा
मात हसत हसत करतो
जीवाची बाजी लावुनी
लढवय्या ,शत्रुशी लढतो…२

अर्पितो प्राण देशासाठी
दुर्दम्य तुझी ईच्छाशक्ती
जीवावर उदार होणे
महान तुझी देशभक्ती…३

घरादारास त्यजुनी
देशकर्तव्यास जागतोस
कुटुंबास मागे सोडुनी
युध्दास सज्ज होतोस…४

देशासाठी समर्पण
शौर्य,धैर्य तुझ्या रूधिरात
समोरच्या शत्रुप्रति मात्र
आग धुमसते ह्दयात….५

देशभक्ती सदा वाहे
तयांच्या नसानसात
कृतज्ञता सैनिकांप्रति
ठेवावी आजन्म मनात….६

भारताचे रक्षण करण्या
लढती सैनिक सीमेवरी
प्रगती पथावर नेण्यास
साह्य करू सर्वतोपरी….७

शूरवीर सैनिकांच्या
त्यागपूर्ण आहे गाथा
धाडस, साहसापुढे
झुकवितो आम्ही माथा….८

सदैव ऋणात तुझ्या
शौर्याचा ना कधी विसर
असीम बलिदान,तुझे
सैनिका आहेस तू अमर…९

डाँ दक्षा पंडित
दादर,मुंबई

Marathi Poem for Jawan in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *