marathi poem Jivan

असे असावे आयुष्य आणि आयुष्य सुंदर आहे | 2 best marathi poem Jivan

रवी आटे आणि सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem Jivan विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi poem Jivan

काव्य बंध समूह आयोजित कविता स्पर्धा
विषय- आयुष्य
1ऑक्टोबर 2023

असे असावे आयुष्य | marathi poem Jivan

असे असावे आयुष्य आणि आयुष्य सुंदर आहे | 2 best marathi poem Jivan

आयुष्याची कधी व्याख्या करू नये
आयुष्य आहे केवळ जगण्याची गोष्ट
व्याख्यांच्या शब्दात अडकलात तर कधीही न सुटणाऱ्या कोड्यात तुम्ही सापडलातच समजा!
तर मग काय करावे मित्रा!


गणित तर सोडवावेच लागेल ना आयुष्याचे
सोपे असो वा कठीण
नाही सोडविले तर जीव गुदमरतच राहणार
चोहीकडे वनवा पेटला असतांना
स्वतः सकट आप्तजणांना त्याच्या केंद्रात बघणे काय शक्य आहे
पण म्हणून काय आयुष्याचे अर्थ सांगत बसायचे
अरे एकेक क्षण जगायचे असते मित्रा


एकही क्षण नजरेतून सुटू नये
नखशिखांत त्या क्षणात स्वतःला चेतनेने भरून घ्यावयाचे असते
काव्य लिहिताना त्यात आखंड बुडता आले पाहिजे
गीत गाताना केवळ गीतच रहावे
मंच व मंचावरील गायक यांचे बाहेर निघून जाणेच
अपेक्षित असते
तेव्हाच कुठे कळते दयाळू कृपाळू परमेश्वराचे आपल्या जीवनात सदैव असणे!
एकदा का हे साध्य झाले तर आयुष्याचा जो अर्थ कळेल मित्रा


त्याने आपण भारावून जाऊ
अज्ञात सुमन वर्षावाने व अपरिचित जीवन सुगंधाने हे जीवन व्यापले जाईल
तर चलायचे काय मित्रा त्याच्या वनात अन् त्याच्या बगीच्यात
तेथे ज्ञात असलेली चाफा जुई रातराणी ही फुले तर भेटतीलच
त्यासोबतच आनंदाचे झरे माणूसकीचे वारे अनुभवता
येतील
सर्व काही मिळेल जे आवश्यक आहे मनुष्याच्या आयुष्याला!!!

रवी आटे
सानपाडा
नवी मुंबई

marathi poem Jivan

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा ,
विषय आयुष्य
दिनांक 1/10/2023

आयुष्य सुंदर आहे—! | marathi poem Jivan

आयुष्य सुंदर आहे | 2 best marathi poem Jivan

आयुष्य सुंदर आहे
भरभरून जगावे
कोणी नसेल आपले तरी,
आपण सर्वांचे होवून पहावे –१

आयुष्याच्या रंगमंचावर
खूपच असतात मुखवटे
त्यातले आपणच ओळखायचे
किती खरे नी किती खोटे–२

नात्याच्या सुंदर धाग्यात
आयुष्य गुंफलेलं असतं
प्रत्येक धाग्याची काळजी घेत
कोणाला तुटू द्यायचं नसतं—३

आयुष्य म्हणजे सुख दुःख
ऊन सावलीचा असतो खेळ
तरीही वाटा शोधत सुखाच्या
जीवनात बसवावा लागतो मेळ — ४

रुसवे फुगवे नकोच कधी
आयुष्य साधं सोपं जगावं
सुंदर दिलेल्या आयुष्याला
समाधानी जीवन मागावं—-५

आयुष्य थोड लहान आहे
आनंदाने बिनधास्त जगावं
आहे त्यात समाधान मानून
नाही ते स्वकष्टानं मिळवावं —-६

मन कोणाचे दुखवू नये
टोचून बोलू नये कोणाला
मन आपले मग मनाला खाते
पटेल का ते सांगा तुम्हाला —७

एकमेकाला आधार देत
आयुष्य आपल सुंदर बनवाव
स्वकष्टाची आर्धी का होईना
तिलाच नेहमी गोड मानून खावं —८

बरोबरी कोणाची करू नये
अंथरूण पाहून पाय पसरावे
कोणी सोन्याची सरी घातली म्हणून
आपण दोरीने गळा का आवळावे —९

आयुष्य जगता जगता आपले
गरिबांचेही नेहमी आशिष घ्यावे
दानधर्म करावा त्यांनाही कधीतरी
आपल्यातले थोडे अन्न त्यांना द्यावे –१०

सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

2 best marathi poem Jivan

marathi poem Jivan

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *